Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे; आयटी शेअर्समधील विक्रीनं गुंतवणूकदारांमध्ये भीती, Sensex ८०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:12 IST

Stock Markets Today: शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीसह झाली. जागतिक बाजारपेठेत एआयबाबत (AI) वाढलेली भीती, अमेरिकन बाजारातील मोठी घसरण आणि कमोडिटी बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

Stock Markets Today: शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीसह झाली. जागतिक बाजारपेठेत एआयबाबत (AI) वाढलेली भीती, अमेरिकन बाजारातील मोठी घसरण आणि कमोडिटी बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांनी घसरून ८२,८७४ वर आला, तर निफ्टी २२० अंकांच्या घसरणीसह २५,५८० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्येही २०० अंकांची कमकुवतता दिसून आली. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स १.२ टक्क्यांनी घसरला असून इंडिया व्हीआयएक्स (India VIX) ३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती आणि टॉप लूजर्स

क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार केल्यास आयटी इंडेक्स ४.३ टक्क्यांनी कोसळला आहे. मेटल आणि रियल्टी क्षेत्रांतही २.६ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्य होते. कंझ्युमर ड्युरेबल्स, मिडस्मॉल हेल्थकेअर, फायनान्शिअल आणि मीडिया यांसारख्या निर्देशांकात १ टक्क्यांहून अधिक घट झाली. 

निफ्टी ५० वर इन्फोसिसचा शेअर ७ टक्क्यांपर्यंत घसरला. टीसीएस, हिंदाल्को, विप्रो, ओएनजीसी, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अदानी एंटरप्रायझेस हे आजचे प्रमुख घसरण झालेले शेअर्स ठरले. मात्र, अशा वातावरणातही एसबीआय लाईफ, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, एसबीआय, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ, मारुती आणि आयसीआयसीआय बँक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.

जागतिक संकेत आणि आशियाई बाजारातील दबाव

सकाळी गिफ्ट निफ्टी सुमारे १८० अंकांनी घसरून २५,७०० च्या जवळ होता, तर आशियाई बाजारांमध्येही दबाव कायम होता. गुंतवणूकदारांचे लक्ष आज जागतिक संकेत, आयटी शेअर्सची वाटचाल आणि कंपन्यांच्या निकालांवर असणार आहे. अमेरिकन बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीमुळे डाओ जोन्स ६७५ अंकांनी तुटून बंद झाला, तर नॅस्डॅक ४७५ अंकांनी घसरला. एआय क्षेत्राबाबतच्या वाढत्या चिंतेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Black Friday for Stocks: IT Sell-off Triggers Investor Panic

Web Summary : Indian stock markets plunged, mirroring global AI fears and US market declines. Sensex fell over 800 points, with IT stocks leading the downturn. Investors are closely watching global cues and company results.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक