Join us

Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:21 IST

नॉर्वे-स्थित ओर्कला एएसएची भारतीय सहाय्यक कंपनी ओर्कला इंडिया, २९ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणारा १,६६७ कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करत आहे. कंपनीची भारतात मोठी उपस्थिती आहे.

नॉर्वे-स्थित ओर्कला एएसएची (Orkla ASA) भारतीय सहाय्यक कंपनी ओर्कला इंडिया (Orkla India), २९ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणारा १,६६७ कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) लाँच करत आहे. आयपीओ उघडण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये (Grey Market) उत्साह दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आयपीओ त्याच्या वरच्या मूल्यापेक्षा ₹७३० पेक्षा अंदाजे १६% ते २२% प्रीमियमवर व्यवहार करत आहे. हे गुंतवणूकदारांचे मजबूत आकर्षण आणि लिस्टिंगवर चांगल्या नफ्याची अपेक्षा दर्शवते. इकोनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, हा आयपीओ तीन दिवसांसाठी खुला राहील आणि तो शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी बंद होईल. हा २.२८ कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठीचा प्रस्ताव आहे, ज्याचं एकूण मूल्य १,६६७.५४ कोटी रुपये आहे.

आयपीओची माहिती

या आयपीओसाठी प्राईज बँड ₹६९५ ते ₹७३० प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे, ज्यामध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. यात २.२८ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. हा 'ऑफर फॉर सेल' असल्यामुळे, आयपीओमधून मिळणारं संपूर्ण उत्पन्न विक्री करणारे भागधारक प्रामुख्याने प्रवर्तक संस्था - ओर्कला एएसए, ओर्कला एशिया होल्डिंग्स एएस, आणि ओर्कला एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड यांना जाईल. या विक्रीतून कंपनीला कोणतंही भांडवल मिळणार नाही.

MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

शेअर वाटप कधी होणार?

आयपीओ अंतर्गत गुंतवणूकदारांना ३ नोव्हेंबर, २०२५ रोजी शेअर्सचं वाटप केलं जाईल, तर कंपनीचे शेअर्स बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर ६ नोव्हेंबर, २०२५ रोजी लिस्ट होतील. ओर्कला इंडिया ही भारतातील एक मल्टी-कॅटेगरी फूड कंपनी आहे, जी एमटीआर फूड्स (MTR Foods), ईस्टर्न मसाले (Eastern Masalas) आणि रसोई मॅजिक यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्ससाठी ओळखली जाते. ही कंपनी भारतीय पॅकेज्ड फूड्स आणि मसाल्यांच्या बाजारपेठेतील एक प्रमुख खेळाडू आहे.

जीएमपीमध्ये (GMP) घट झाल्यामुळे सुरुवातीचा उत्साहात किंचित कमी झाला असला तरी, विश्लेषकांचं म्हणणं आहे की, कंपनीची मजबूत ब्रँड ओळख आणि एफएमसीजी (FMCG) सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास असल्यामुळे ओर्कला इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांची आवड अजूनही कायम आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Orkla India IPO: GMP Surges; Subscription, Listing Dates Announced

Web Summary : Orkla India's IPO opens October 29th, aiming to raise ₹1,667 crores. Grey market shows strong premium. IPO closes October 31st, shares allotted November 3rd, and lists on November 6th. It's an offer for sale, benefiting promoters.
टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक