Tata Motors Demerger: टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाच्या डीमर्जरसाठी १४ ऑक्टोबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना नवीन कंपनीचे शेअर्स मिळतील. रेकॉर्ड तारखेपर्यंत असलेल्या प्रत्येक १ शेअरसाठी शेअरधारकांना एक नवीन शेअर मिळेल. जर तुमच्याकडे १०० शेअर्स असतील तर तुम्हाला TMLCV चे १०० नवीन शेअर्स मिळतील.
ईटीच्या रिपोर्टनुसार, कंपनीनं मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असलेल्यांना त्याच प्रमाणात टीएमएलसीव्ही नावाच्या नवीन कंपनीचे शेअर्स ऑफर केले जातील, म्हणजेच कंपनीच्या प्रत्येक १ शेअरसाठी गुंतवणूकदाराला टीएमएलसीव्हीचा १ शेअर मिळेल.
हे डीमर्जर टाटा मोटर्स लिमिटेड (मूळ कंपनी), TMLCV (नवीन स्थापन झालेली कंपनी) आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV, जे आता विलीन झालं आहे) यांच्या मोठ्या पुनर्रचनेचा एक भाग आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई बेंचची मंजुरी आणि इतर नियामक मंजुरींनंतर ही योजना १ ऑक्टोबर रोजी लागू झाली. कंपनीचा व्यावसायिक वाहन व्यवसाय TML कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेडमध्ये (TMLCV) विलीन केला जाईल. विद्यमान कंपनीचं नाव बदलले जाईल, प्रवासी वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं आणि जग्वार लँड रोव्हर (JLR) व्यवसाय कायम ठेवले जातील.
गुंतवणूकदारांसाठी काय आहेत महत्त्वाचं?
शेअरवर परिणाम : डीमर्जरच्या रेकॉर्ड डेटची घोषणा झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ५% पर्यंत वाढ दिसून आली.
लिस्टिंग : नवीन कंपनी TMLCV चे शेअर्स नोव्हेंबर २०२५ मध्ये बीएसई आणि एनएसई वर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे.
मूल्य निश्चिती : डीमर्जरनंतर बाजार आता दोन्ही कंपन्यांचं स्वतंत्र मूल्यांकन करेल, ज्यामुळे शेअर्समध्ये चढ-उतार वाढू शकतात.
पुनर्रचना एक मोठं पाऊल
ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियलनं देखील म्हटलंय आहे की हे पुनर्रचना (Restructuring) एक मोठं पाऊल आहे. पूर्वी जी तारीख अंदाजित होती, म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२५, आता तिच अंतिम "रेकॉर्ड डेट" आहे. ब्रोकरेजचं मत आहे की सीव्ही (कमर्शियल व्हेईकल) व्यवसाय वेगळा झाल्यामुळे शेअरमधील चढ-उतार वाढू शकतात, कारण आता बाजार टाटा मोटर्सला फक्त पॅसेंजर व्हेईकल म्हणून मूल्यमापन देईल. त्यांचा अंदाज आहे की, जर सर्व औपचारिकता वेळेवर पूर्ण झाल्या, तर नवीन कंपनी TMLCV चा शेअर नोव्हेंबरच्या सुरुवातीला लिस्ट होऊ शकतो.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुतंवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Tata Motors has set October 14, 2025, as the record date for its commercial vehicle demerger. Shareholders will receive one share of TMLCV for each Tata Motors share held. TMLCV shares are expected to list in November 2025.
Web Summary : टाटा मोटर्स ने अपने वाणिज्यिक वाहन डीमर्जर के लिए 14 अक्टूबर, 2025 को रिकॉर्ड तिथि घोषित की है। शेयरधारकों को टाटा मोटर्स के प्रत्येक शेयर के लिए टीएमएलसीवी का एक शेयर मिलेगा। टीएमएलसीवी के शेयर नवंबर 2025 में सूचीबद्ध होने की उम्मीद है।