Join us

शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:58 IST

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडले. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स २३० अंकांनी घसरला. निफ्टी देखील ७० अंकांनी घसरला.

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडले. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स २३० अंकांनी घसरला. निफ्टी देखील ७० अंकांनी घसरला. आयटी निर्देशांक ३% पेक्षा जास्त घसरला. ट्रम्प यांनी एच१बी व्हिसा नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. याव्यतिरिक्त, फार्मा, रियल्टी, मेटल आणि हेल्थ सर्व्हिस यासारख्या निर्देशांकांमध्येही घसरण झाली. मीडिया, एनबीएफसी आणि ऑटो निर्देशांकांमध्ये हलकी खरेदी झाली.

निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, अदानी पोर्ट्स, एटरनल आणि बजाज ऑटो हे शेअर्स वधारले. तर टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

शेअर बाजारात मोठी घसरण

सेन्सेक्स मागील बंदपेक्षा ४७५ अंकांनी घसरुन ८२,१५१ वर उघडला. निफ्टी ८९ अंकांनी घसरुन २५,२३८ वर उघडला आणि बँक निफ्टी ६७ अंकांनी घसरुन ५५,३९१ वर उघडला. चलन बाजारातही रुपयाची सुरुवात कमकुवत झाली आणि तो डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी कमकुवत होऊन ८८.१८/ डॉलर्सवर उघडला.

आठवड्याची सुरुवात अनेक महत्त्वाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ट्रिगरनं होतं. अमेरिकेच्या राजकारणापासून ते भारतीय कर सुधारणांपर्यंत, गुंतवणूकदार प्रत्येक आघाडीवर लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीच्या हंगामाच्या मध्यभागी, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये नवीन H1B व्हिसासाठी शुल्क $१००,००० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. एकमेव दिलासा म्हणजे याचा विद्यमान व्हिसाच्या नूतनीकरणावर परिणाम होणार नाही.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक