Join us

ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:02 IST

Share Market Opening 7 August, 2025: गुरुवारी, पुन्हा एकदा देशांतर्गत शेअर बाजारानं मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू केले.

Share Market Opening 7 August, 2025: गुरुवारी, पुन्हा एकदा देशांतर्गत शेअर बाजारानं मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू केले. आठवड्याच्या चौथ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स २८१.०१ अंकांनी (०.३५%) घसरणीसह ८०,२६२.९८ अंकांवर व्यवहार सुरू झाला. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक आज ११०.०० अंकांच्या (०.४५%) घसरणीसह २४,४६४.२० अंकांवर उघडला. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली. या २५ टक्के अतिरिक्त करानंतर, अमेरिकेनं भारतावर लादलेला एकूण कर आता ५० टक्के झाला आहे.

आज, सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी फक्त ४ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि उर्वरित सर्व २६ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. दुसरीकडे, आज निफ्टी ५० मध्येही ५० पैकी फक्त १० कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि उर्वरित सर्व ४० कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, मारुती सुझुकीचे शेअर्स आज सर्वाधिक ०.३६ टक्के वाढीसह उघडले आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स आज सर्वाधिक १.२१ टक्के घसरणीसह उघडले.

लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी

यामध्ये तेजी/घसरण

सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये, गुरुवारी बजाज फिनसर्व्हचे शेअर्स ०.३२ टक्के, आयटीसीचे शेअर्स ०.११ टक्के आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.०४ टक्के वाढीसह उघडले.

दुसरीकडे, आज टाटा स्टीलचे शेअर्स ०.९८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.९७ टक्के, इटर्नल ०.८४ टक्के, एसबीआय ०.८२ टक्के, टाटा मोटर्स ०.६५ टक्के, ट्रेंट ०.६४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.६१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.५७ टक्के, एशियन पेंट्स ०.५३ टक्के, बीईएल ०.५१ टक्के, बजाज फायनान्स ०.४३ टक्के, एल अँड टी ०.४३ टक्के, भारती एअरटेल ०.४१ टक्के, एचसीएल टेक ०.३४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३४ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३२ टक्के, एनटीपीसी ०.३० टक्के, टीसीएस ०.२९ टक्के, अ‍ॅक्सिस बँक ०.२० टक्के, इन्फोसिस ०.१९ टक्के, सन फार्मा ०.१८ टक्के, टेक महिंद्रा ०.१३ टक्के, टायटन ०.१३ टक्के, पॉवर ग्रिड ०.११ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ०.०४ टक्के घसरणीसह उघडले.

टॅग्स :शेअर बाजार