Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठे बदल! १ एप्रिलपासून F&O नियमांमध्ये होणार मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:14 IST

F&O Trading New Rules: १ एप्रिल २०२६ पासून भारतीय शेअर बाजारात अनेक मोठे बदल होणार आहेत. पाहा कोणते आहेत ते बदल.

F&O Trading New Rules: १ एप्रिल २०२६ पासून भारतीय शेअर बाजारात अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मधील वाढ आणि नवीन मार्जिन नियमांचा समावेश आहे. हे बदल २०२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते आणि आता त्यांची अंमलबजावणी होत आहे. सरकारनं F&O विभागातील सट्टेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी STT वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

STT च्या नवीन दरांमध्ये मोठी वाढ

हे नवीन दर १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील : 

  • फ्युचर्स (Futures): पूर्वी STT ०.०२% होता, जो आता ०.०५% होईल (१५०% वाढ). 
  • ऑप्शन्स प्रीमियम (Options Premium): पूर्वी ०.१% होता, आता ०.१५% होईल (५०% वाढ).
  • ऑप्शन्स एक्साईज्ड (Options Exercised): पूर्वी ०.१२५% होता, आता ०.१५% होईल (सुमारे २०% वाढ).

ट्रेडर्सच्या कमाईवर काय परिणाम होईल?

STT सामान्यतः विक्रीच्या बाजूवर (Sell side) आकारला जातो. फ्युचर्समध्ये ट्रेड व्हॅल्यूवर आणि ऑप्शन्समध्ये प्रीमियम व्हॅल्यूवर हा टॅक्स घेतला जातो. उदाहरणार्थ, जर तुम्ही १ कोटी रुपयांचा फ्युचर्स ट्रेड केला, तर पूर्वी २,००० रुपये STT लागायचा, जो आता ५,००० रुपये लागेल. जे ट्रेडर्स दररोज किंवा आठवड्यातून अनेक ट्रेड्स करतात, त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होईल आणि लहान ट्रेडर्सच्या कमाईवरही याचा परिणाम होऊ शकतो.

५० टक्के कॅश-मार्जिनचा नवीन नियम

१ एप्रिल २०२६ पासून F&O सेगमेंटमध्ये एक नवीन नियम लागू होईल. आता एकूण आवश्यक मार्जिनपैकी किमान ५०% रक्कम रोख स्वरूपात ठेवणे अनिवार्य आहे. उर्वरित ५०% रक्कम कोलॅटरल (शेअर्स किंवा इतर सिक्युरिटी) स्वरूपात ठेवता येईल. या नियमामुळे ट्रेडर्सना जास्त रोख रक्कम बाळगावी लागेल, ज्यामुळे त्यांची लिव्हरेज घेण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि पोझिशन टिकवून ठेवण्याचा खर्च वाढू शकतो.

इतर महत्त्वाचे बदल

  • म्युच्युअल फंडमधील पारदर्शकता : १ एप्रिलपासून एसेट मॅनेजमेंट कंपन्या बेस एक्सपेंस रेशोमध्ये फक्त फंड मॅनेजमेंट फी समाविष्ट करतील. एसटीटी, स्टॅम्प ड्युटी आणि ब्रोकरेज यांसारखे इतर खर्च स्वतंत्रपणे दाखवावे लागतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना नेमका खर्च समजणं सोपं होईल.
  • शेअर बायबॅक : प्रमोटर्सना शेअर बायबॅकमधून मिळणाऱ्या कॅपिटल गेनवर १२% सरचार्ज द्यावा लागेल. सामान्य गुंतवणूकदारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
  • डिलिव्हरी आणि इंट्राडे : शेअर डिलिव्हरी आणि इंट्राडे ट्रेडिंगवरील STT मध्ये कोणताही बदल झालेला नाही.

गुंतवणूकदारांवर या बदलांचा परिणाम काय?

  • F&O ट्रेडर्स: ट्रेडिंगचा एकूण खर्च वाढेल. जास्त प्रमाणात ट्रेडिंग करणाऱ्यांना नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे बाजारात स्थिरता येऊ शकते.

  • दीर्घकालीन गुंतवणूकदार : दीर्घकालीन गुंतवणूकदारांवर या बदलांचा फारसा परिणाम होणार नाही. ते डिलिव्हरी ट्रेडिंग किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपली गुंतवणूक सुरू ठेवू शकतात.
English
हिंदी सारांश
Web Title : F&O Trading: Major Changes Coming April 1st, New Rules Explained

Web Summary : Significant F&O trading rule changes, including STT hikes and margin adjustments, take effect April 1st, 2026. STT increases impact futures and options. A 50% cash margin rule is introduced. Mutual fund expense transparency improves; share buyback surcharge applies.
टॅग्स :शेअर बाजारअर्थसंकल्प २०२६गुंतवणूक