Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घोषणा! तब्बल 600% नफा वाटणार ही कंपनी; 8 वरून 872 रुपयांवर पोहोचला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:13 IST

कंपनीने 6 रुपये प्रति शेअर (600% डिव्हिडेंड)च्या अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या बोर्ड मेंबरने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील अपल्या कमाईची घोषणा करत डिव्हिडेंड देण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. कंपनीने 6 रुपये प्रति शेअर (600% डिव्हिडेंड)च्या अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. शुक्रवारच्या सौद्यात बीएसईवर हा शेअर 873.80 रुपयांवर बंद झाला.

काय म्हणाली कंपनी? -कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, “बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 6 रुपये प्रति इक्विटी शेअर अर्थात 600% अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. हा लाभांश 27 फेब्रुवारी 2023 रोजी अथवा यानंतर दिला जाईल.' यासाठी बोर्डाची रेकॉर्ड तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

कंपनीचे तिमाहितील निकाल -समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 38% ने वाढून ₹527 कोटी झाला आहे. तसेच, ऑपरेशन्समधून त्याचे उत्पन्न जवळपास 64% ने वाढून ₹8,310 कोटी झाले आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्सचा मॅक्सिमम रिटर्न 9,718.90% एवढा आहे. 11 वर्षात हा शेअर 8 रुपयांवरून 872.90 रुपयांवर पोहोचला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक