Join us

जिओला भारती एअरटेलचा धोबीपछाड; सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांमध्ये मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:14 IST

Bharati Airtel : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांचे मार्केट कॅप घसलरले. पण, यात भारती एअरटेलने बाजी मारली आहे.

Bharati Airtel : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री झाल्यापासून किमान डझनभर कंपन्यांचा कायमचा बाजार उठला असेल. सध्या केवळ एअरटेल, व्हिआय, जिओ आणि बीएसएनएल या चारच कंपन्या बाजारात टिकून आहेत. त्यातही जिओ आणि एअरटेल कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळते. यात जिओने आघाडी घेत ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करुन आणखी एक बिझनेस थाटला. जिओ सध्या आयपीएल स्पर्धांचे लाईव्ह प्रक्षेपण करत आहे. मात्र, त्याच दरम्यान एअरटेलने मोठी बाजी मारली आहे.

कमी व्यापार सत्रांच्या शेवटच्या आठवड्यात, सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) एकत्रितपणे २,९४,१७०.१६ कोटी रुपयांनी घसरले. सर्वात जास्त तोटा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला झाला. गेल्या आठवड्यात, बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स २०५०.२३ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१४.८ अंकांनी खाली आला. सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि आयटीसी यांचे बाजारमूल्य घसरले.

एअरटेलचा मोठा डावया घसरणीत भारती एअरटेल ही एकमेव कंपनी होती, जिच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे. या आठवड्यात, टीसीएसचे बाजारमूल्य १,१०,३५१.६७ कोटी रुपयांनी घसरून ११,९३,७६९.८९ कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन ९५,१३२.५८ कोटी रुपयांनी घसरून १६,३०,२४४.९६ कोटी रुपयांवर आले. तर इन्फोसिसचे मूल्य ४९,०५०.०४ कोटी रुपयांच्या तोट्यासह ६,०३,१७८.४५ कोटी रुपयांवर घसरले.

बजाज फायनान्सचे बाजार भांडवल १४,१२७.०७ कोटी रुपयांनी घसरून ५,४०,५८८.०५ कोटी रुपये झाले. आयसीआसीआय बँकेचे मूल्यांकन ९,५०३.६६ कोटी रुपयांनी घसरून ९,४३,२६४.९५ कोटी रुपये झाले. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन ८,८००.०५ कोटी रुपयांनी घसरून १३,९०,४०८.६८ कोटी रुपये झाले आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​मूल्यांकन ३,५००.८९ कोटी रुपयांनी घसरून ५,२७,३५४.०१ कोटी रुपये झाले.

रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानावरस्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल ३,३९१.३५ कोटी रुपयांनी घसरून ६,८५,२३२.३३ कोटी रुपये झाले. ITC चे मार्केट कॅप ३१२.८५ कोटी रुपयांनी घसरून ५,१२,५१५.७८ कोटी रुपये झाले. तर दुसरीकडे भारती एअरटेलचे बाजार मूल्य ७,०१३.५९ कोटी रुपयांनी वाढून ९,९४,०१९.५१ कोटी रुपये झाले.

वाचा - काय होतास तू, काय झालास तू.. इराणमध्ये १० लाख रियालची किंमत फक्त १ डॉलर, नेमकं काय घडलं?

टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :एअरटेलजिओशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक