Join us

Belrise Industries IPO : शेअर बाजारात उतरताच १०० रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर मात्र घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:56 IST

Belrise Industries Share Price: बाजारात येताच कंपनीचे शेअर्स १०० रुपयांवर पोहोचलेत. बुधवारी एनएसईवर बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर ११ टक्क्यांनी वधारून १०० रुपयांवर लिस्ट झाला.

Belrise Industries Share Price: बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडची शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. बाजारात येताच कंपनीचे शेअर्स १०० रुपयांवर पोहोचलेत. बुधवारी एनएसईवर बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर ११ टक्क्यांनी वधारून १०० रुपयांवर लिस्ट झाला. तर कंपनीचे शेअर्स बीएसईवर ९.४४% प्रीमियमसह ९८.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये बेलराईज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ९० रुपये होती. मात्र, लिस्टिंगनंतर एनएसईवर कंपनीचा शेअर ९५.३६ रुपयांवर घसरला. तर बीएसईवर कंपनीचा शेअर ९५.३० रुपयांवर पोहोचला आहे. बेलारूस इंडस्ट्रीजचा एकूण इश्यू साइज २,१५० कोटी रुपयांपर्यंत होता.

काय करते कंपनी?

बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना १९८८ मध्ये झाली. कंपनी ऑटोमोटिव्ह शीट मेटल, कास्टिंग पार्ट्स, पॉलिमर कम्पोनंट्स, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी सस्पेंशन आणि मिरर सिस्टम तयार करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये बजाज, होंडा, हिरो, जग्वार लँड रोव्हर, रॉयल एनफील्ड, व्हीई कमर्शियल व्हेइकल्स, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मेटल चेसिस सिस्टम, पॉलिमर कम्पोनंट्स, सस्पेंशन सिस्टम, बॉडी-इन-व्हाइट घटक आणि एक्झॉस्ट सिस्टम यांचा समावेश आहे.

यावेळी ब्लँक चेक नाही... बुडत्या पाकिस्तानाला सतत IMF कडून का मिळतोय 'ऑक्सिजन'? पॅटर्नवर भारताची नजर

IPO ला जबरदस्त प्रतिसाद

बेलराईज इंडस्ट्रीजचा आयपीओ (Belrise Industries IPO) एकूण ४३.१४ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत ४.५२ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) श्रेणीत ४०.५८ पट सबस्क्रिप्शन मिळालं. बेलराईज इंडस्ट्रीजच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत ११२.६३ पट सबस्क्राईब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी गुंतवणूक करता येणार होती. १ लॉटसाठी गुंतवणूकदारांना १४,९४० रुपये गुंतवावे लागणार होते. कंपनीचा आयपीओ २१ मे २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २३ मे पर्यंत खुला राहिला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक