Bajaj Finance Share Price: बजाज फायनान्सच्या संचालक मंडळाची आज बैठक आहे. कंपनी बोनस शेअर्स आणि डिविडेंडसह शेअर वाटण्याचीही घोषणा करू शकते. बजाज फायनान्सनं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूकदारांना गेल्या १५ वर्षांत भरघोस परतावा दिला आहे. कंपनीनं एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य चार कोटींपेक्षा अधिक केलं आहे. बोनस शेअर्स आणि शेअर वाटपाच्या आधारे बजाज फायनान्सनं ही कामगिरी केली आहे. बजाज समूहाच्या या कंपनीचे मार्केट कॅप ५,६५,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.
१ लाखांचे झाले ४ कोटी
३० एप्रिल २०१० रोजी बजाज फायनान्सचा शेअर ४१.५६ रुपयांवर होता. त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीनं बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला कंपनीचे २४०५ शेअर्स मिळाले असते. सप्टेंबर २०१६ मध्ये मल्टीबॅगर कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देऊ केले. म्हणजेच कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर दिला. हे बोनस शेअर्स जोडले तर एकूण शेअर्सची संख्या ४८१० होते. कंपनीचा शेअर २८ एप्रिल २०२५ रोजी बीएसईवर ९०९२ रुपयांवर बंद झाला. या शेअर्सचं सध्याचं मूल्य ४.३७ कोटी रुपये आहे. या गणनेत कंपनीनं दिलेला लाभांश आणि स्टॉक स्प्लिट्स समाविष्ट केलेले नाहीत.
सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
१० वर्षांत २१०० टक्क्यांची वाढ
गेल्या दहा वर्षांत बजाज फायनान्सचे शेअर्स जवळपास २१०० टक्क्यांनी वधारले आहेत. २४ एप्रिल २०१५ रोजी मल्टीबॅगर कंपनीचा शेअर ४१३.५४ रुपयांवर होता. बजाज फायनान्सचा शेअर २८ एप्रिल २०२५ रोजी ९०९२ रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्सनं २९२ टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये ३३ टक्के वाढ झाली. तर कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)