Join us

एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:52 IST

Bajaj Finance Ltd: कंपनीचे शेअर्स २ भागांमध्ये विभागले जाणार आहेत. तर दुसरीकडे कंपनी एकावर चार बोनस शेअर्सही देणार आहे.

Bajaj Finance Ltd: बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स सोमवारी फोकसमध्ये होते. दरम्यान, आता कंपनी एका शेअरवर ४ शेअर्स बोनस देत आहे. याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. बजाज फायनान्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बीएसईवर ०.३२ टक्क्यांनी घसरून ९,३३४.१५ रुपयांवर बंद झाला.

२ भागांत विभागला जाणार शेअर

बजाज फायनान्स लिमिटेडचे समभाग दोन भागात विभागले जात आहेत. या विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर १ रुपयांपर्यंत खाली येईल. त्याचबरोबर कंपनीनं म्हटलंय की, १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना ४ बोनस शेअर्स देखील दिले जातील. बजाज फायनान्स लिमिटेडनं सोमवार, १६ जून २०२५ रोजी शेअर स्प्लिट आणि बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच या दिवशी ज्यांच्याकडे शेअर्स असतील त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट या दोन्हीचा फायदा मिळेल.

परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

दुसऱ्यांदा एक्स बोनस ट्रेड

शेअर बाजारात कंपनी दुसऱ्यांदा एक्स-बोनस ट्रेड करणार आहे. यापूर्वी कंपनीनं २०१६ मध्ये एक्स-बोनस ट्रेड केलं होता. त्यानंतर कंपनीला एका शेअरवर एक शेअर फ्री मिळाला. तर यावर्षी ३० मे रोजी कंपनीचा एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाला होता. त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ४४ रुपये लाभांश देण्यात आला. २०१६ मध्ये बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअर्सची विभागणी करण्यात आली आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सची ५ भागांमध्ये विभागणी केली. ज्यानंतर शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर २ रुपयांपर्यंत खाली आली.

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९७८५.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६४२६.०५ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक