Bagmane Prime Office REIT IPO: बंगळुरूच्या प्राइम ऑफिस स्पेस मार्केटमधील आघाडीची कंपनी Bagmane Prime Office REIT चा IPO आज (५ मे) पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. मजबूत पोर्टफोलिओ आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा पाठिंब्यामुळे या इश्यूकडे बाजाराचे विशेष लक्ष लागले आहे.
IPO संबंधित महत्त्वाचे तपशील
- सब्सक्रिप्शन कालावधी: ५ मे ते ७ मे
- प्राइस बँड: ₹९५ ते ₹१०० प्रति युनिट
- इश्यू साइज: एकूण ₹३,४०५ कोटी
- फ्रेश इश्यू: ₹२,३९० कोटी
- ऑफर फॉर सेल (OFS): ₹१,०१५ कोटी
अँकर गुंतवणूकदारांकडून मजबूत प्रतिसाद
IPO खुलण्यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ₹१,१५० कोटी उभारले आहेत. ₹१०० प्रति युनिट दराने ११.४९ कोटी युनिट्सचे वाटप करण्यात आले. या इश्यूमध्ये झुनझुनवाला डिस्क्रीशनरी ट्रस्टसह SBI Life Insurance, Kotak Mahindra Mutual Fund, Tata AIG General Insurance आणि Max Life Insurance यांसारख्या मोठ्या संस्थांनी गुंतवणूक केली आहे. ₹२,७६६ कोटींच्या इन्स्टिट्यूशनल भागातील ₹८५० कोटींचा स्ट्रॅटेजिक बुक पूर्णपणे सब्सक्राइब झाला आहे.
कंपनीचा दमदार पोर्टफोलिओ
बागमाने ग्रुप हा बंगळुरूतील ‘ग्रेड A+’ ऑफिस स्पेसचा प्रमुख मालक आणि डेव्हलपर आहे. कंपनीकडे प्रमुख बिझनेस जिल्ह्यांमध्ये ६ प्रीमियम ऑफिस पार्क्स आहेत.
मुख्य प्रकल्पांमध्ये:
- बागमाने टेक पार्क
- वर्ल्ड टेक्नॉलॉजी सेंटर
- कॉन्स्टेलेशन बिझनेस पार्क
- कॉसमॉस बिझनेस पार्क
डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीची ऑक्युपन्सी ९८.८% होती, जी भारतातील लिस्टेड REITs मध्ये सर्वाधिक मानली जाते.
दिग्गज क्लायंट्सचा विश्वास
कंपनीच्या क्लायंट यादीत Google, Amazon, Nvidia आणि Samsung यांसारख्या जागतिक टेक कंपन्यांचा समावेश आहे.
लिस्टिंगनंतरची स्थिती
लिस्टिंगनंतर हा REIT भारतातील सहावा लिस्टेड REIT ठरणार आहे. तो Embassy Office Parks REIT, Mindspace Business Parks REIT आणि Brookfield India REIT यांसारख्या विद्यमान REIT कंपन्यांमध्ये सामील होईल.
निधीचा वापर कसा होणार?
कंपनी IPO मधून मिळालेला निधी मुख्यतः नवीन कमर्शियल प्रॉपर्टीज खरेदी करण्यासाठी आणि विद्यमान पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यासाठी वापरणार आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Bagmane Prime Office REIT's ₹3405 crore IPO opens with a price band of ₹95-₹100. झुनझुनवाला Trust and other major investors have already invested, drawn by the company's strong portfolio of Bangalore office spaces and high occupancy rates.
Web Summary : Bagmane Prime Office REIT का ₹3405 करोड़ का IPO खुला, मूल्य बैंड ₹95-₹100 है। झुनझुनवाला ट्रस्ट और अन्य बड़े निवेशकों ने बैंगलोर कार्यालय स्थानों के मजबूत पोर्टफोलियो और उच्च अधिभोग दर से आकर्षित होकर निवेश किया है।