Join us

बाटलीने नव्हे, शेअरने चढली नशा! १० रुपयांच्या स्टॉकचा मल्टीबॅगर परतावा, गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:58 IST

Alcohol Company Stock : गेल्या काही वर्षांत दारू उत्पादक कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ज्यांनी या शेअरमध्ये एक लाख गुंतवले आहेत ते आज करोडपती झाले आहेत.

Alcohol Company Stock : तुम्ही ऐकले असेल की जास्त दारू प्यायल्यास लोक वाया जातात. पण, दारू बनवणाऱ्या कंपनीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत, हे तुम्ही ऐकले आहे का? शेअर बाजारात चढ-उतार सामान्य असले तरी, काही शेअर्स असे असतात जे दीर्घकाळात गुंतवणूकदारांना प्रचंड नफा देतात. अशीच एक कंपनी म्हणजे असोसिएटेड अल्कोहोल्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड. या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ज्या व्यक्तीने या शेअरमध्ये फक्त १ लाख रुपये गुंतवले, तो आज करोडपती झाला आहे.

एकेकाळी १० रुपयांपेक्षा कमी असलेला शेअर आज ११०० रुपयांच्या वरया कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत १,१०० रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एकेकाळी हा शेअर १० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होता? ज्या गुंतवणूकदारांनी योग्य वेळी गुंतवणूक केली आणि संयम ठेवला, त्यांच्यासाठी हा शेअर आज कोट्यवधींची मालमत्ता बनला आहे.

शेअरची सध्याची स्थितीआज, बुधवारी शेअर बाजारात थोडीशी घसरण दिसून आली, तरी असोसिएटेड अल्कोहोल्सचे शेअर्स सुमारे १,१७५.९० रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे ७४% परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी त्याची किंमत ६७८ रुपये होती, ती आता १,१८० रुपयांवर पोहोचली आहे. या काळात, स्टॉकने १,४९६ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांकही गाठला होता.

जर आपण दोन वर्षांच्या कालावधीबद्दल बोललो, तर या शेअरने सुमारे १८०% परतावा दिला आहे. याचा अर्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य २.८० लाख रुपये झाले असते. पाच वर्षांत, या शेअरमध्ये ३६८% वाढ झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीची १ लाख रुपयांची गुंतवणूक आता ४.६८ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे.

१ लाखाचे झाले १.३० कोटीया स्टॉकची खरी ताकद त्याच्या ११ वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यावर दिसून येते. फेब्रुवारी २०१४ मध्ये या कंपनीचा शेअर फक्त ९ रुपयांच्या आसपास होता. आज, हा स्टॉक १,१८० रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ त्याने गुंतवणूकदारांना १३,०००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे!

वाचा - FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?

याचा सरळ अर्थ असा की, जर कोणी ११ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत १.३० कोटी रुपयांपेक्षा जास्त असती. फक्त एक लाख रुपये गुंतवून करोडपती होण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण कदाचितच दुसरे असेल. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक