Join us

अनिल अंबानींची गरुडझेप; 99% घसरुन ₹ 1.13 वर आलेला हा शेअर, आता 3100% वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:12 IST

Anil Ambani : या शेअरने अवघ्या पाच वर्षात 1 लाखाचे 32.26 लाख केले.

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत मोठी वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर 99 टक्क्यांहून अधिक घसरून 1.13 रुपयांवर आला होता. पण, यानंतर शेअरमध्ये 3100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मंगळवारी(25 फेब्रुवारी) हा शेअर 36.46 रुपयांवर बंद झाला. या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी 54.25 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.37 रुपये आहे.

1 लाखाचे 32 लाख झाले23 मे 2008 रोजी अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स 274.84 रुपयांवर होते. या पातळीपासून शेअर्स 99 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर पोहोचले. पण, 25 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 36.46 रुपयांवर बंद झाले. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 3126% वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची आतापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर 1 लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सचे सध्याचे मूल्य 32.26 लाख रुपये झाले असेल.

4 वर्षात 748% झेप रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 748% वाढले आहेत. 26 फेब्रुवारी 2021 रोजी अनिल अंबानींच्या पॉवर कंपनीचे शेअर्स 4.30 रुपयांवर होते. 26 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 36.46 रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 180 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, एका वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 44% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 14,645 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक