Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹२ च्या खाली आलेला अनिल अंबानींचा हा शेअर; आता अवघ्या सात दिवसांत २५% वाढला भाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:31 IST

Anil Ambani Share: कंपनीचे मार्केट कॅप १०,५०० कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

Anil Ambani Share:अनिल अंबानी यांच्या मालकीच्या Reliance Power या कंपनीच्या शेअरमध्ये अलीकडच्या काही दिवसांत लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (१० एप्रिल १०२६) बीएसईमध्ये इंट्राडे दरम्यान कंपनीचा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी वाढून २५.६८ रुपयांवर पोहोचला.

अल्पावधीतच जोरदार वाढ

गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, मागील ७ ट्रेडिंग सत्रांत हा शेअर २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. ३० मार्च २०२६ रोजी २०.२३ रुपयांवर ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर गाठल्यानंतर या शेअरमध्ये जलद पुनरागमन झाले आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप १०,५००  कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

दीर्घकालीन घसरणीनंतर रिकव्हरी

रिलायन्स पॉवरचा शेअर एकेकाळी ११ फेब्रुवारी २००८ रोजी ५३८ रुपयांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर दीर्घकाळ घसरण सुरू राहिली आणि २७ मार्च २०२० रोजी तो अवघ्या १.१५ रुपयांवर आला. या नीचांकी पातळीवरून शेअरमध्ये तब्बल ५८०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तरीही, मागील ५-६ महिन्यांत पुन्हा काही प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय.

बोनस शेअर्सचा लाभ

दरम्यान, रिलायन्स पॉवरने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही दिले आहेत. मे २००८ मध्ये कंपनीने ३:५ या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले होते, म्हणजेच प्रत्येक ५ शेअर्समागे ३ बोनस शेअर्स देण्यात आले होते.

शेअरहोल्डिंग पॅटर्न

डिसेंबर २०२५ तिमाहीतील आकडेवारीनुसार, कंपनीतील प्रमोटरची हिस्सेदारी २४.९८ टक्के आहे, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ७५.०२ टक्के आहे. अल्पावधीत झालेली ही तेजी गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मानली जात असली, तरी दीर्घकालीन घसरण आणि अलीकडील अस्थिरता लक्षात घेता गुंतवणुकीपूर्वी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

(विशेष सूचना- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Ambani's Reliance Power share jumps 25% after hitting low.

Web Summary : Reliance Power share surges 25% in a week after hitting a 52-week low. Despite past declines, the stock shows recovery, with experts advising caution before investing.
टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक