Join us

₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:29 IST

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं. मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, एक्सपर्ट काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स.

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं. मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. एनर्जी, आयटी आणि एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे, तर वाहन क्षेत्रात तुलनेनं कमी खरेदीचं वातावरण दिसून आलं. 

निफ्टीनं मंगळवारी इतिहासात प्रथमच २३५०० ची जादुई पातळी ओलांडली. जून एक्सपायरी सीरिजमध्ये निफ्टी २४००० ची पातळी पाहू शकतो, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. निफ्टीनं आज २३५७० चा नवा उच्चांकी स्तर गाठला, तर सेन्सेक्सनं ७७३२७ चा नवा उच्चांक गाठला होता. यादरम्यान, जेके सिमेंटसह काही शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश असल्याचं दिसून आलं. 

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस जेके सिमेंट, फाईव्ह स्टार आणि एंजेल वनला बाय रेटिंग दिलं आहे. सध्या एंजेल वनचा शेअर २६०० ते २६५० दरम्यान ट्रेड करत असून ब्रोकरेजनं या शेअरला ४२०० चं टार्गेट प्राईज दिलं आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा हे तब्बल ६२ टक्क्यांनी अधिक आहे. तर जेके सिमेटला ५३०० रुपये आणि फाईव्ह स्टारला ९५० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलंय. 

जेके सिमेंट : जेके सिमेंटनं क्षमता विस्तार आणि मजबूत अंमलबजावणीच्या सहाय्याने मजबूत व्हॉल्यूम वाढ दर्शविली आहे. पन्ना येथील कॅपॅसिटी वाढवण्याची योजना आणि ग्राइंडिंग क्षमता रुळावर आहे. ही आर्थिक वर्ष २०२६ च्या तिमाहीत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. लॉजिस्टिक्स, वीज आणि इंधन आणि इतर निश्चित खर्चातील बचतीमुळे पुढील दोन-तीन वर्षांत संभाव्य खर्चात कपात होण्याची शक्यता व्यवस्थापनानं व्यक्त केल्याचं मोतीलाल ओस्वालनं म्हटलंय. 

फाईव्ह स्टार : फाईव्ह स्टार ही कंपनी स्मॉल टिकिट सिक्युअर्ड बिझनेस लोन देते. त्यांचा सध्याचा मार्केट शेअर २० टक्के आहे. कमी स्पर्धा आणि बँकिंगचा लाभ घेत नसलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात तेजी आहे. त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये सामर्थ्य आणि क्षमता विकसित केली आहे. ती त्यांच्या स्पर्धकांसाठी कठीण असल्याचं मत ब्रोकरेजनं व्यक्त केलंय. 

एंजेल वन :  एंजेल वन आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करत आहे. ज्यामध्ये पुढील २-३ वर्षांत वितरण महसुलात मजबूत वाढीसह रोख सेगमेंटमधील बाजारपेठेतील हिस्सा मिळविण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. कर्ज, विमा आणि इतर काही उत्पादनांमधून वितरण विभागात वाढ होईल, असं ब्रोकरेजनं म्हटलंय. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक