Join us

उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:06 IST

Railway Company IPO : रेल्वे कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आहेत. कंपनीचा आयपीओ उघडताच पूर्णपणे सबस्क्राईब झालाय.

Railway Company IPO : रेल्वे कंपनी एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आहेत. कंपनीचा आयपीओ उघडताच पूर्णपणे सबस्क्राईब झालाय. एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीचा आयपीओ पहिल्या तासात ४ पट सबस्क्राईब झाला. कंपनीचा आयपीओ १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. कंपनीचे शेअर्स आधीच ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीचे शेअर्स ११७% पेक्षा जास्त प्रीमियमसह ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करताहेत. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार ९१.१० कोटी रुपयांपर्यंत आहे.

१४० रुपये शेअरची किंमत

आयपीओमध्ये एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत १४० रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये १६५ रुपयांच्या प्रीमियमसह ट्रेड करत आहेत. कंपनीचे शेअर्स सध्या ११७% पेक्षा जास्त प्रीमियमवर आहेत. एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमधील शेअर्सचं वाटप १६ सप्टेंबर रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स १८ सप्टेंबर २०२५ रोजी बाजारात लिस्ट होतील.

आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीजचा आयपीओ पहिल्या एका तासात ४ पट सबस्क्राईब झाला. कंपनीचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७.२६ पट सबस्क्राईब झाला, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा ३.८८ पट सबस्क्राईब झाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ २ लॉटसाठी अर्ज करू शकतात. आयपीओच्या २ लॉटमध्ये २००० शेअर्स आहेत. म्हणजेच सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये २.८० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणारे.

कंपनीचा व्यवसाय काय?

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजी लिमिटेड डिसेंबर १९९८ मध्ये सुरू करण्यात आली. ही कंपनी भारतीय रेल्वेच्या रोलिंग स्टॉकसाठी सुटे भाग तयार करते. एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीज भारतीय रेल्वेसाठी रोलिंग स्टॉक कम्पोनंट्स आणि इंटिरिअर प्रोजेक्ट्सची निर्मिती करते. त्याचबरोबर एरोस्पेस आणि संरक्षणासाठी गुंतागुंतीचे पार्ट्स तयार करते. कंपनीनं श्रीलंकेच्या डीईएमयू, मेनलाइन कोच, आग्रा-कानपूर मेट्रो, आरआरटीएस, विस्टाडोम कोच आणि ट्रेन-१८ वंदे भारत एक्सप्रेससाठी रोलिंग स्टॉक पार्ट्स बनवलेत आणि इंटिरिअर प्रोजेक्ट्सच्या व्यवस्थापनाचं काम पाहिलंय.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक