Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेटापासून गुगलपर्यंत... भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक संधी! टाटाकडून नवीन इक्विटी फंड लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:52 IST

Tata AIA Global Equity Fund NFO : टाटा एआयएने गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल इक्विटी फंड सुरू केला आहे. या फंडामुळे गुंतवणूकदार परदेशी कंपन्यांमध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकतात.

Tata AIA Global Equity Fund NFO : भारतीय शेअर बाजाराच्या पलीकडे जाऊन आता जागतिक स्तरावर नफा कमावण्याची संधी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने 'टाटा एआयए ग्लोबल इक्विटी फंड' हा नवीन फंड लाँच केला असून, याद्वारे गुंतवणूकदारांना ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या दिग्गज जागतिक कंपन्यांच्या वाढीचा थेट लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या गुंतवणुकीसोबतच गुंतवणूकदारांना जीवन विम्याचे संरक्षणही मिळणार आहे.

गुंतवणुकीसह विम्याचे दुहेरी फायदेहा फंड टाटा एआयएच्या युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनशी जोडलेला आहे. त्यामुळे केवळ संपत्ती निर्मिती नव्हे, तर कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवचही येथे मिळते. लाँग टर्म गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जात आहे.

एनएफओमध्ये गुंतवणुकीची आज शेवटची संधी!

  • या फंडचा न्यू फंड ऑफर २६ फेब्रुवारीला खुला झाला असून, आज ५ मार्च २०२६ हा त्यात गुंतवणुकीचा शेवटचा दिवस आहे.
  • युनिट किंमत: ५ मार्च २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत युनिटची किंमत १० डॉलर निश्चित करण्यात आली आहे.
  • गुंतवणुकीचे धोरण: हा फंड प्रामुख्याने जागतिक म्युच्युअल फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करेल. यात ७०% ते १००% हिस्सा जागतिक इक्विटीमध्ये, तर गरज पडल्यास ०% ते ३०% हिस्सा डेट किंवा मनी मार्केटमध्ये गुंतवला जाईल, ज्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होईल.

या लाँचिंगबद्दल बोलताना टाटा एआयएचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर हर्षद पाटील म्हणाले, "जागतिक अर्थव्यवस्था आता एकमेकांशी जोडली गेली आहे. त्यामुळे केवळ भारतीय बाजारावर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करणे, दीर्घकालीन मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आमचा हा फंड गुंतवणूकदारांना व्यावसायिक दृष्टिकोनातून जागतिक प्रगतीचा फायदा मिळवून देईल."

फंडची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. विविध देश आणि क्षेत्रांत गुंतवणूक केल्यामुळे एकाच बाजारपेठेतील जोखमीचा प्रभाव कमी होतो.
  2. 'टाटा एआयए शुभ ग्लोबल इन्व्हेस्ट' सारख्या प्लॅनद्वारे किंवा कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि भागीदार चॅनेलवरून यात गुंतवणूक करता येईल.
  3. हा फंड दीर्घकालीन भांडवल वृद्धी आणि नियमित उत्पन्नाच्या संधी शोधण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

वाचा - साध्या कागदावर लिहिलेली वसीयत कायद्याने वैध आहे का? जाणून घ्या एक चूक किती महागात पडू शकते

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Tata AIA Offers Global Investment Opportunities with New Equity Fund

Web Summary : Tata AIA launched a global equity fund, offering Indian investors access to giants like Apple and Google. This unit-linked plan combines wealth creation with life insurance. The NFO closes today, March 5, 2026, with units priced at $10. It invests in global equities, reducing risk through diversified markets.
टॅग्स :शेअर बाजारटाटास्टॉक मार्केटगुंतवणूक