ITDC Share Price: इंडियन टुरिजम अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) शेअर्सवर आज गुंतवणूकदारांना उड्या घेतल्या. आयटीडीसीचा शेअर आज ५२४.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर उघडला आणि काही मिनिटांतच ५८९ रुपये प्रति शेअरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते, अशोका हॉटेलच्या असेट मॉनेटायझेशन प्रस्तावावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक जाहीर झाल्यानंतर सकाळच्या व्यवहारात आयटीडीसीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. सकाळी ११ वाजता तो १३ टक्क्यांनी वधारून ५७५ च्या आसपास व्यवहार करत होता.
दोन मुख्य कारणांमुळे वाढला भाव
आयटीडीसीच्या शेअरची किंमत दोन मुख्य कारणांमुळे वाढत आहे. पहिली म्हणजे अशोका हॉटेल्सच्या असेट मॉनेटायझेशन प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेणं. दुसऱ्या महाकुंभानंतर चौथ्या तिमाहीचे दमदार निकाल आहेत, अशी प्रतिक्रिया लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन म्हणाले. आयटीडीसी बोर्डानं मालमत्ता मुद्रीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ११ मार्च २०२५ रोजी बैठक आयोजित केली असल्याचंही ते म्हणाले.
टार्गेट प्राईज काय?
'आयटीडीसीचा शेअर टेक्निकल चार्टवर मजबूत दिसत आहे. या शेअरला ६०० रुपयांच्या पातळीवर रेझिस्टंसला सामोरं जावं लागत आहे, तर ५४० रुपयांवर मजबूत आधार तयार केला आहे. क्लोजिंग बेसिसवर ६०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यावर हा शेअर ६५० रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा आपण करू शकतो," अशी प्रतिक्रिया आयटीडीसीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करताना चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगरिया यांनी व्यक्त केली.
“नवे गुंतवणूकदार आयटीडीसी शेअर्समध्ये मोमेंटम खरेदी सुरू करू शकतात. याचं शॉर्ट टर्म टार्गेट ६५० रुपये आणि स्टॉप लॉस ५४० रुपये ठेवू शकता,” असंही बगडिया म्हणाले.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)