Aditya Infotech IPO: व्हिडीओ सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्स उत्पादनं प्रदान करणारी सीपी प्लस कंपनी, आदित्य इन्फोटेक लिमिटेडचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि गुंतवणूकदार ३१ जुलैपर्यंत गुंतवणूक करू शकतात. कंपनीनं मंगळवारी आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी अँकर गुंतवणूकदारांकडून ५८२ कोटी रुपये उभारले. या आयपीओद्वारे कंपनीने एकूण १,३०० कोटी रुपये उभारण्याची तयारी केली आहे. यामध्ये ५०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील, तर ८०० कोटी रुपये ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) उभारले जातील.
आदित्य इन्फोटेक प्राईज बँड
कंपनीनं आयपीओसाठी प्राईज बँड ६४० ते ६७५ रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. आयपीओ बुक करण्यासाठी, किमान २२ शेअर्ससाठी गुंतवणूक करावी लागेल, ज्यासाठी १४,८५० रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, २२ च्या पटीत अधिक शेअर्ससाठी बोली लावता येईल.
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आयपीद्वारे उभारलेल्या निधीतून ३७५ कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. कंपनीनं दाखल केलेल्या ड्राफ्ट पेपर्सनुसार, मार्च २०२४ पर्यंत कंपनीवर ४०५ कोटी रुपयांचे कर्ज होतं.
Aditya Infotech IPO GMP
आदित्य इन्फोटेकच्या ग्रे मार्केट प्राईजबद्दल बोलायचं झालं तर, मंगळवारी सकाळी तो २५५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. हे त्याच्या इश्यू प्राइसच्या ६७५ रुपयांच्या अपर बँडपेक्षा ३७.७८ टक्के जास्त आहे. म्हणजेच, आयपीओ प्रति शेअर ९३० रुपयांच्या आसपास लिस्ट होऊ शकतो. जीएमपी मार्केट सेंटिमेंट्सवर अवलंबून असतो आणि तो बदलत राहतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)