Join us

Adani Group News : गौतम अदानींसाठी 'अच्छे दिन', सर्वात मोठ्या कंपनीने 105 मिनिटांत कमवले 45 हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:20 IST

Adani Group News : गौतम अदानी यांच्या Adani Enterprises च्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Adani Group News : असं म्हणतात की, वाईट काळ जास्त दिवस राहत नाही. अदानी समूहासाठी आता अच्छे दिन सुरू झाल्याचे दिसत आहे. शेअर बाजार उघडताच अदानी समूहातील सर्वात मोठ्या कंपनीला मोठा फायदा झाला आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची सुरुवात मंद गतीने झाली, पण बाजार उघडल्यानंतर 105व्या मिनिटाला कंपनीचा शेअर 25 टक्के वेगाने वधारला. यादरम्यान कंपनीला सुमारे 45 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. सध्या कंपनीचा शेअर 15 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस खूप शुभ आहे. कंपनीचा स्टॉक 25 टक्क्यांच्या वेगाने धावत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 24 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. आजच्या डेटाबद्दल बोलायचे तर, कंपनीचा शेअर आज सकाळी 9.15 वाजता थोड्या घसरणीसह 1568.05 रुपयांवर उघडला आणि 105 मिनिटांच्या ट्रेडिंगनंतर 25 टक्क्यांनी वाढून 1965.50 रुपयांवर पोहोचला. दुपारी 12:05 पर्यंत कंपनीचा शेअर 15 टक्क्यांच्या वाढीसह 1,803 रुपयांवर व्यवहार करत आहे.

105 मिनिटांत 45 हजार कोटींचा नफाआपण कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोललो तर काही मिनिटांतच कंपनीने 45,000 कोटी रुपये कमावले आहेत. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1572.40 रुपयांवर बंद झाला होता आणि मार्केट कॅप 1,79,548.69 कोटी रुपये होते. आज जेव्हा कंपनीचा शेअर 1965.50 कोटी रुपयांवर पोहोचला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 2,24,435.86 कोटी रुपये झाले. म्हणजेच सकाळी 11 वाजता कंपनीचे मार्केट कॅप 44,887.17 कोटी रुपयांवर आले आहे.

कंपनीचे शेअर्स का वाढले?गौतम अदानी यांनी कर्जाची पूर्वपेमेंट केल्याची बातमी आणि अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या तिमाही निकालात नफा झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेससह, अदानीच्या इतर शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट आहे. दुसरीकडे, अदानी विल्मरचेही शेअर 5 टक्के वाढले आहेत.

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजारशेअर बाजार