Join us

अदानी ग्रुपची बंपर खरेदी, स्वतःच्या कंपन्यांचे 2 कोटींहून अधिक शेअर्स विकत घेतले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:58 IST

अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन एनर्जीतील आपला हिस्सा वाढवला आहे.

Adani group news: दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन एनर्जी, या दोन कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. NSE डेटानुसार, समूहाने 10 मे ते 23 मे दरम्यान अदानी एंटरप्रायझेसचे 72.70 लाख शेअर्स खरेदी केले. त्याची किंमत 2,162 कोटी रुपये आहे. तर, अदानी ग्रीन एनर्जीचे 1.39 कोटी शेअर्स सुमारे 2,507 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

कोणाकडे किती शेअरएनएसईच्या आकडेवारीनुसार, समूहाच्या इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट DMCC ने 764 कोटी रुपयांचे शेअर्स आणि केम्पास ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटने 1,398 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. तर, आर्डोर इन्व्हेस्टमेंट होल्डिंगने अदानी ग्रीन एनर्जीचे 1,599 कोटी आणि अदानी ट्रेडलाइन्सने 908 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. 31 मार्चपर्यंत प्रवर्तकांकडे अदानी एंटरप्रायझेसमध्ये 72.61 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 56.37 टक्के भागभांडवल होते.

16,600 कोटी उभारण्यास मंजुरीअदानी एंटरप्रायझेसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये उभी केली जाऊ शकते. यासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने 24 जून रोजी भागधारकांची बैठक बोलावली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सबद्दल बोलायचे तर बुधवारी त्यांना मोठी मागणी होती. या शेअरमध्ये 1.50% वाढ झाली आणि किंमत 3321 रुपयांवर पोहोचली. अदानी ग्रीनच्या शेअर्सबद्दल बोलायचे तर तो रेड झोनमध्ये होता आणि 1860 रुपयांच्या खाली आला. 

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक