Join us

अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:25 IST

Adani Green Energy : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने हरीत उर्जा निर्मितीच्या बाबतीत गुजरातमध्ये मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Adani Green Energy : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) कंपनीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने आपली अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता १५,००० मेगावॅटचा टप्पा पार करून १५,५३९.९ मेगावॅट पर्यंत पोहोचवली आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारी AGEL ही भारतातील पहिलीच अक्षय ऊर्जा कंपनी ठरली आहे, ज्यामुळे देशाच्या हरित ऊर्जा क्रांतीला मोठी गती मिळाली आहे.

गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा प्रकल्पया ऐतिहासिक कामगिरीसाठी कंपनीने गुजरातमधील खावडा येथे १,०११.५ मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प सुरू केला आहे. विशेष म्हणजे, अदानी ग्रीन एनर्जी खावडामध्ये जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारत आहे, ज्याची एकूण क्षमता तब्बल ३०,००० मेगावॅट असेल. हा प्रकल्प एवढा मोठा आहे की, तो अनेक लहान देशांच्या एकूण ऊर्जा गरजेएवढा वीज पुरवठा करू शकतो.

कंपनीचे पोर्टफोलिओ आणि भविष्यकालीन लक्ष्यAGEL च्या पोर्टफोलिओमध्ये आता ११,००५.५ मेगावॅट सौर ऊर्जा, १,९७७.८ मेगावॅट पवन ऊर्जा आणि २,५५६.६ मेगावॅट पवन-सौर संकरित (hybrid) ऊर्जा यांचा समावेश आहे. अदानी ग्रीन एनर्जी सध्या भारताच्या १५ टक्क्यांहून अधिक अक्षय ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत आहे. कंपनीचे २०३० पर्यंत ५०,००० मेगावॅट पर्यंत स्वच्छ वीज पुरवण्याचे मोठे लक्ष्य आहे, जे भारताच्या 'नेट झिरो'च्या ध्येयामध्ये मोठे योगदान देईल.

वाचा - तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत

हरित ऊर्जेवर लक्ष केंद्रित का?आजच्या काळात हरित ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रदूषण कमी होते, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी मदत होते आणि कोळसा व पेट्रोलियम सारख्या जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी होते. हरित ऊर्जा क्षेत्र वेगाने वाढत आहे आणि यात गुंतवणूक करून, अदानी समूह पर्यावरणाचे संरक्षण करत आहे आणि आपल्या व्यवसायाची व्याप्ती देखील वाढवत आहे. 

टॅग्स :अदानीगौतम अदानीग्रीन प्लॅनेटवीज