Join us

रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:14 IST

Ace Investors Portfolio 2025: बाजारातील अलिकडच्या घसरणीदरम्यान, अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. कोणत्या गुंतवणूकदाराने कोणते स्टॉक खरेदी आणि विक्री केले ते जाणून घ्या.

Ace Investors Portfolio 2025: गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ पासून शेअर बाजारात सुरू झालेल्या घसरणीला एप्रिलमध्ये ब्रेक लागला. मात्र, त्यानंतरही ट्रम्प टॅरिफ, परदेशी गुंतवणूकदांची विक्री, कमकुवत तिमाही निकाल यामुळे बाजार आजही हेलकावे खात आहे. मात्र, पडत्या बाजारातच खरेदीची उत्तम संधी असते, असं तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक अनिश्चिततेमध्ये बाजारात घसरण झाल्यानंतर, अनेक क्षेत्रे आणि समभागांचे मूल्यांकन आकर्षक झाले आहे. अशा परिस्थितीत, अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समधील आपला वाटा वाढवला आहे.

रेखा झुनझुनवाला :रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीतील त्यांचा हिस्सा ४.०८% ने वाढवला आहे, ज्यामुळे त्यांचा एकूण हिस्सा डिसेंबर २०२४ मध्ये १.०७% वरून ५.१५% झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या २६ स्टॉक आहेत, ज्यांचे एकूण मूल्य ३७,९१२.७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

डॉली खन्ना : जानेवारी-मार्च तिमाहीत डॉली खन्ना यांनी जीएचसीएलमध्ये १.०३% हिस्सा खरेदी केला, तर पॉलीप्लेक्स कॉर्पमध्ये त्यांच्याकडे १.१६% हिस्सा होता. मार्च तिमाहीत खन्ना यांनी सोम डिस्टिलरिजमधील त्यांचा हिस्सा १.३९% वरून २.४१% पर्यंत वाढवला.

मधुसूदन केला : मधु केला यांनी मार्च तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन स्मॉलकॅप स्टॉक जोडले आहेत. केला यांनी विंडसर मशीन्समध्ये ७.७१%, एसजी फिनसर्व्हमध्ये १.७०% आणि प्रताप स्नॅक्समध्ये ४.६१% हिस्सा खरेदी केला. गुंतवणूकदाराने कोप्रानमधील आपला हिस्सा डिसेंबर तिमाहीत १.०४% वरून १.४६% पर्यंत वाढवला.

आशिष कचोलिया : आशिष कचोलिया यांनी बीईडब्ल्यू इंजिनिअरिंगमधील त्यांचा हिस्सा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४.२८% होता, तो ४.८५% पर्यंत वाढवला. कचोलिया यांनी अलीकडेच ट्रेन कंट्रोलिंग सोल्यूशन्स प्रदात्या क्वाड्रंट फ्युचर टेकमध्येही हिस्सा खरेदी केला आहे, जो जानेवारी २०२५ मध्ये शेअर बाजारात पदार्पण करत आहे. थॉमस स्कॉट (इंडिया) मध्येही त्यांचा २.४३% हिस्सा आहे.

मुकुल अग्रवाल : डिसेंबर २०२४ पर्यंत टायर उत्पादक कंपनी CEAT मध्ये मुकुल अग्रवाल यांचा १.११% हिस्सा होता. परंतु, मार्च २०२५ च्या तिमाहीत प्रमुख भागधारकांच्या यादीतून त्यांचे नाव गायब झाले होते, याचा अर्थ यातून ते यातून बाहेर पडलेत. डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत त्यांचा १.२३% हिस्सा असलेल्या लक्झरी घड्याळांच्या किरकोळ विक्रेत्या इथोसमधूनही त्यांचे नाव गायब झाले. क्विक हील टेक्नॉलॉजीज, सारडा एनर्जी अँड मिनरल्स आणि ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या चौथ्या तिमाहीच्या शेअरहोल्डर यादीतूनही त्याचे नाव गायब झाले.

वाचा - Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारशेअर बाजार