Join us

टायर तयार करणाऱ्या कंपनीनं दिला आश्चर्याचा धक्का, शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; बनला मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 22:35 IST

या शेअरने 2,181.69 रुपयांचा आपला मागील विक्रमी उच्चांकही ओलांडला आहे. 25 मे 2023 रोजी शेअरने हा उच्चांक गाठला होता. तसेच गुरुवारी या शेअरची क्लोजिंग प्राइस 2498.10 रुपये एवढी होती. 

टायर निर्माता कंपनी असलेल्या सिएटच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त वाढ दिसू आली. आठवड्यातील चौथ्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर 20 टक्क्यांनी वधारून 2510.75 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या कामगिरी बरोबरच या शेअरने 2,181.69 रुपयांचा आपला मागील विक्रमी उच्चांकही ओलांडला आहे. 25 मे 2023 रोजी शेअरने हा उच्चांक गाठला होता. तसेच गुरुवारी या शेअरची क्लोजिंग प्राइस 2498.10 रुपये एवढी होती. 

ही प्राइस गेल्या एक दिवसापूर्वीच्या तुलनेत, शेअरमध्ये 405.80 रुपये अथवा 19.39 टक्क्यांची तेजी दर्शवते. या तेजीमुळे Ceat चे मार्केट कॅपिटल 10,000 कोटी रुपयांच्याही वर पोहोचले. तसेच, इंट्रा-डे ट्रेडमध्ये कंपनीच्या मार्केट कॅपने 10,200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

केव्हा किती परतावा -Ceat च्या शेअरने वेगवेगळ्या कालावधीत पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. हा शेअर एका आठवड्यात 20 टक्क्यांनी वधारला आहे. एका महिन्यात 32 टक्क्यांनी, तर एका वर्षात 145 टक्क्यांनी वधारला आहे. महत्वाचे म्हणजे, वायटीडीच्या आधारावर या शेअरमध्ये 55 टक्क्यांची तेजी आली आहे.

आरपीजी एंटरप्रायजेसची मुख्य कंपनी असलेल्या सिएट कंपनीचे टायर 2-3 व्हिलर वाहने, एसयूव्ही, यूटिलिटी, कॉमर्शियल आदि वाहनांसाठी वापरले जातात. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार