Join us

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:57 IST

8th Pay Commission: आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना नेमकी किती वेतनवाढ मिळेल, याची चर्चा होत असून ही वेतनवाढ प्रामुख्याने 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असेल.

8th Pay Comission: आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना नेमकी किती वेतनवाढ मिळेल, याची चर्चा होत असून ही वेतनवाढ प्रामुख्याने 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असेल. मंत्रिमंडळानं याच आठवड्यात आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या 'संदर्भ अटी' (टर्स ऑफ रेफरन्स) मंजूर केल्या असून आयोगाला १८ महिन्यांत अहवाल सादर करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. सरकारच्या मंजुरीनंतर शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे.

वेतनवाढ किती?

फिटमेंट फॅक्टरमुळे वेतनात सरासरी २० ते २५% वाढ अपेक्षित आहे. उदाहरणार्थ फिटमेंट फॅक्टर २.० असल्यास ५० हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचे नवीन मूळ वेतन १ लाख रुपये होईल. पेन्शनर्सनाही त्याच प्रमाणात वाढ मिळेल. म्हणजेच ३० हजार रुपयांचे पेन्शन ६० हजार रुपये होईल.

पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? समजून घ्या ?

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आठव्या आयोगासाठीचा फॅक्टर आयोगाच्या अहवालानंतरच ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ३५,००० रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.११ ठरवला, तर नवीन मूळ वेतन ७३,८५० रुपये होईल.

घरभाडं भत्ता

नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर गृहभाडे भत्ता (एचआरए) टक्केवारीनुसार वाढेल, तर वाहतूक भत्त्याचे दर स्वतंत्र पुनरावलोकनानंतर ठरतील.

महागाई भत्ता महागाई भत्ता (डीए) थेट फिटमेंट फॅक्टरद्वारे ठरत नाही, परंतु आयोग सध्याच्या महागाई दराचा विचार करतो. सध्या ५८% असलेला डीए २०२६ पर्यंत ७०% होण्याचा अंदाज आहे. फिटमेंट फॅक्टर ठरवताना याचा विचार होईल. याशिवाय कुटुंबातील गृहित सदस्यसंख्या ३ वरून ४ वर नेली जाऊ शकते. त्यातून एकूण फिटमेंट फॅक्टरवर सुमारे १३% अतिरिक्त परिणाम होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : 8th Pay Commission: Understanding Fitment Factor and Salary Calculation

Web Summary : The 8th Pay Commission's approval sparks salary increase discussions, heavily reliant on the 'fitment factor.' Expected to be implemented from January 2026, a 20-25% salary hike is anticipated. Fitment factor will be decided after commission report.
टॅग्स :सरकारपैसा