Share Market Crash : सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या तुफान विक्रीमुळे बाजाराचे 'सेंटीमेंट' बिघडले. शुक्रवारी व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९५० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीने २५,२०० ची महत्त्वाची पातळी तोडली. आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व १५ प्रमुख सेक्टोरल इंडेक्स लाल निशाण्यावर बंद झाले.
बाजारातील पडझडीची ५ मोठी कारणे१. जागतिक बाजारातील मरगळआशियाई बाजारात कोस्पी (दक्षिण कोरिया), निक्केई (जपान) आणि शांघाय कंपोझिटमध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेत एनव्हिडियाचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले येऊनही, सेमीकंडक्टर शेअर्समध्ये ५.५% घसरण झाली, ज्याचा नकारात्मक परिणाम भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रावर झाला.
२. परदेशी गुंतवणूकदारांची विक्रीपरदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी सुमारे ३,४६६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. सलग सुरू असलेल्या या विक्रीमुळे बाजारातून भांडवल बाहेर जात असून देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
३. 'इंडिया विक्स'मध्ये वाढगुंतवणूकदारांमधील भीती मोजणारा 'इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स' ३ टक्क्यांनी वाढून १३.४४ वर पोहोचला. इंडेक्स वाढणे म्हणजे बाजारात अनिश्चितता वाढली असून, अस्वल सध्या बाजारावर पकड मिळवून असल्याचे संकेत तांत्रिक तज्ज्ञांनी दिले आहेत.
४. भू-राजकीय तणावअमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकार्यक्रमावरील चर्चा कोणत्याही कराराविना संपली. यामुळे मध्यपूर्वेत लष्करी संघर्ष वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने जागतिक स्तरावर गुंतवणूकदार सावध पावले उचलत आहेत.
५. रुपयाची ऐतिहासिक घसरणपरदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्यामुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी घसरून ९०.९५ वर आला. रुपया कमकुवत झाल्याने आयात महागण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा दबाव शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला.
वाचा - अफगाण-पाक युद्धामुळे भारतीय गुंतवणुकीला धोका! २७ हजार कोटींच्या प्रकल्पांवर टांगती तलवार
तांत्रिक चार्ट काय सांगतात?जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टीमध्ये वरच्या स्तरावर वारंवार येणारे अडथळे चिंताजनक आहेत. आता २५,३०० चा स्तर निफ्टीसाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे. जर बाजार २५,३०० च्या खाली राहिला, तर गुंतवणूकदारांना आपली रणनीती बदलावी लागेल. मात्र, जर २५,६७० च्या वर टिकला, तर पुन्हा २५,९०० पर्यंत झेप घेण्याची शक्यता आहे.
Web Summary : Indian stock market crashes 961 points due to global cues, FII selling, geopolitical tensions, and rupee depreciation. IT sector shows resilience amidst the downturn.
Web Summary : वैश्विक संकेतों, एफआईआई की बिक्री, भू-राजनीतिक तनाव और रुपये में गिरावट के कारण भारतीय शेयर बाजार 961 अंक गिरा। मंदी के बीच आईटी क्षेत्र में लचीलापन दिखा।