Join us

Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:19 IST

Ather IPO GMP Today : एथर एनर्जीचा आयपीओ एक बुक बिल्डिंग इश्यू असून त्याद्वारे कंपनीनं २९८१.०६ कोटी रुपये उभारण्याचा योजना बनवली आहे. पाहा काय आहे कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमिअम.

एथर एनर्जी लिमिटेड आईपीओ (Ather Energy IPO) आणि आयवेअर सप्लायचेन सर्व्हिसेस लिमिटेडचा आईपीओ (Iware Supplychain Services IPO) आजपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. एथर एनर्जीचा आयपीओ एक बुक बिल्डिंग इश्यू असून त्याद्वारे कंपनीनं २९८१.०६ कोटी रुपये उभारण्याचा योजना बनवली आहे. हे २६२६ कोटी रुपये मूल्याच्या ८.१८ कोटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि ३५७.७६ कोटी रुपये किंमतीच्या १.११ कोटी ऑफर फॉर सेल शेअर्सचं कॉम्बिनेशन आहे.

आयपीओसाठी प्राइस बँड ३०४ ते ३२१ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. एथरच्या एका लॉटमध्ये ४६ शेअर्स आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १३,९८४ रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे. सुमारे ७५% सार्वजनिक ऑफर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी, सुमारे १०% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५% नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव आहे.

EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जीएमपी किती?

बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलिस्टेड मार्केटमध्ये एथर एनर्जीचा आयपीओ जीएमपी (Ather Energy IPO GMP) शून्य रुपये आहे. यापूर्वी इश्यूचा सर्वाधिक जीएमपी १७ रुपये होता, तो आता ० रुपयांवर आला आहे. उत्पादन क्षमता वाढविणं, अंशत: कर्ज फेडणं आणि संशोधन आणि विकासात गुंतवणूक करण्याच्या उद्देशानं कंपनी २,६२६ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ३५५ कोटी रुपयांपर्यंत ऑफर फॉर सेलदेखील आणणार आहे, ज्यामुळे विद्यमान भागधारकांना त्यांचा काही हिस्सा विकण्याची परवानगी मिळेल.

एथर एनर्जीमध्ये सर्वात मोठा हिस्सा असलेली हीरो मोटोकॉर्प आयपीओनंतर आपला हिस्सा ३८ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर आणणार आहे. त्याचवेळी कंपनीचे संस्थापक तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांच्याकडे सध्या ६.८ टक्के हिस्सा असून ते आपला हिस्सा ५.५ टक्क्यांपर्यंत कमी करतील.

 (टीप - यामध्ये केवळ आयपीओविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक