Join us
Daily Top 2Weekly Top 5

Zomato ची रेकॉर्डब्रेक कामगिरी; अवघ्या ९० दिवसांत केली तब्बल ₹१७४ कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:57 IST

Zomato Q4 FY26 Result: फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रात Zomato ची गाडी सूसाट...

Zomato Q4 FY26 Result: फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी Eternal Limited (पूर्वी Zomato) ने वित्त वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ७१ टक्क्यांनी वाढून ₹१७४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा ₹३९ कोटी होता, तर तिसऱ्या तिमाहीत ₹१०२ कोटी होता. विश्लेषकांनी ₹१२१ कोटींचा अंदाज व्यक्त केला होता.

कंपनीच्या या मजबूत कामगिरीमागे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit आणि फूड डिलिव्हरी व्यवसायातील सातत्यपूर्ण वाढ कारणीभूत ठरली आहे.

महसुलात मोठी झेप

चौथ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशनल महसूल १९६ टक्क्यांनी वाढून ₹१७,२९२ कोटी झाला. मागील वर्षी तो ₹५,८३३ कोटी होता. मागील तिमाहीत कंपनीने ₹१६,३१५ कोटी महसूल नोंदवला होता. तसेच, पूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीचा महसूल ₹५४,३६४ कोटींवर पोहोचला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १६९ टक्क्यांनी अधिक आहे.

वार्षिक नफ्यात घट

तथापि, संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा नफा ₹३६६ कोटी राहिला, जो मागील वर्षाच्या ₹५२७ कोटींच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चौथ्या तिमाहीत खर्च ₹१७,४०६ कोटी झाला, जो मागील वर्षी ₹६,१०४ कोटी होता. तर, पूर्ण वर्षासाठी खर्च ₹५५,१४५ कोटींवर पोहोचला आहे.

शेअरमध्ये सकारात्मक हालचाल

चांगल्या निकालांनंतर कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया दिसली. दिवसभरातील घसरण भरून निघाली आणि शेअरने खालच्या स्तरावरून सुमारे ५.५ टक्क्यांची उसळी घेतली. दुपारच्या सत्रात शेअर ₹२५८.४० या स्तरावर १.१ टक्के वाढीसह व्यवहार करत होता.

फूड डिलिव्हरी व्यवसायात वाढ

फूड डिलिव्हरी विभागाचा महसूल ३० टक्क्यांनी वाढून ₹३,१२५ कोटी झाला. मागील वर्षी तो ₹२,४०९ कोटी होता. तसेच, कंपनीचे मासिक सक्रिय ग्राहक २५.४ दशलक्षांवर पोहोचले असून, मागील वर्षी ते २०.९ दशलक्ष होते.

Blinkitची कामगिरी ठळक

क्विक कॉमर्स शाखा Blinkit ने चौथ्या तिमाहीत ₹३७ कोटी EBITDA नोंदवला, तर मागील वर्षी तोटा ₹१७८ कोटी होता. कंपनीचा महसूल ₹१३,२३२ कोटींवर पोहोचला असून, युजर बेस २७.२ दशलक्षांवर गेला आहे. डार्क स्टोअर्सची संख्या २,२४३ झाली आहे. Zomato च्या ‘Going Out’ विभागाचा महसूल २१ टक्क्यांनी वाढून ₹२७७ कोटी झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Zomato's Record-Breaking Performance: ₹174 Crore Profit in 90 Days

Web Summary : Zomato's Q4 FY26 net profit surged 71% to ₹174 crore, exceeding expectations. Revenue jumped 196% to ₹17,292 crore, driven by Blinkit and food delivery growth. While annual profit declined, positive market reaction followed the strong results. Food delivery revenue rose 30%, and Blinkit achieved ₹37 crore EBITDA.
टॅग्स :झोमॅटोव्यवसायगुंतवणूक