Join us

नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:43 IST

EPFO Rules on Interest : पीएफ म्हणजे नोकरदारांसाठी भविष्याची तरतूद आहे. पण, बऱ्याचदा मनात एक प्रश्न येतो की जर तुमची नोकरी कोणत्याही कारणास्तव गेली तर पीएफच्या पैशांवरील व्याज थांबते का?

EPFO Rules on Interest : नोकरी सोडल्यानंतर किंवा नोकरी गमावल्यावर अनेकांसाठी तो एक कठीण काळ असतो. अशा वेळी सर्वात मोठी चिंता ही असते की, भविष्यासाठी पीएफमध्ये जमा केलेल्या बचतीचे काय होईल? त्यावर व्याज मिळणे बंद होईल का? जर तुम्हालाही हा प्रश्न सतावत असेल, तर जाणून घ्या की ईपीएफओने याबद्दल स्पष्ट नियम सांगितले आहेत. नोकरी सुटल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यावर पैसे जमा होत राहतात आणि त्यावर व्याजही मिळत राहते.

पीएफच्या पैशांवर कधीपर्यंत व्याज मिळते?ईपीएफओच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, तर त्याच्या पीएफ खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत राहते. हे व्याज तोपर्यंत मिळत राहते, जोपर्यंत संबंधित सदस्य ५८ वर्षांचा होत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमचे पैसे फक्त पडून राहत नाहीत, तर वेळेनुसार वाढतही राहतात. ५८ वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतरही जर पैसे खात्यात पडून असतील, तर त्यावर व्याज मिळणे बंद होते. या वयानंतर सरकार असे गृहीत धरते की संबंधित व्यक्ती निवृत्त झाली असून तिने आपली रक्कम काढून घेतली पाहिजे.

तुमच्या पीएफची शिल्लक कशी तपासाल?तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक (बॅलन्स) खूप सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी काही सोपे पर्याय खालीलप्रमाणे आहेत.मिस्ड कॉल: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ या नंबरवर मिस्ड कॉल द्या. काही वेळात तुम्हाला तुमच्या शिल्लकेची माहिती मिळेल.एसएमएस: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN ENG असा मेसेज ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवा.वेबसाइट: ईपीएफओच्या Member Passbook वेबसाइटवर जाऊन UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि तुमची पासबुक पाहा.उमंग ॲप : जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल, तर उमंग ॲप डाऊनलोड करून ईपीएफओ सेक्शनमध्ये जाऊन पीएफ पासबुक आणि क्लेम स्टेटस तपासू शकता. 

टॅग्स :ईपीएफओगुंतवणूककर्मचारीसरकारी योजना