Investment Tips : आपल्याला अनेकदा वाटते की, एफडीमध्ये मोठी रक्कम गुंतवल्याने आपले भविष्य सुरक्षित झाले, पण तसे नाही. एका नवीन निवृत्त झालेल्या उद्योजकाला वाटले की त्यांनी आपले संपूर्ण १.२० कोटी रुपये मुदत ठेवीमध्ये ठेवून आपले भविष्य पूर्णपणे सुरक्षित केले आहे. त्यांना खात्री होती की या पैशातून त्यांचे उर्वरित आयुष्य आरामदायी जाईल. पण, जेव्हा आर्थिक सल्लागारांनी त्यांची गुंतवणूक योजना पाहिली, तेव्हा त्यांना आढळले की या 'सुरक्षितते'च्या मागे मोठा धोका लपलेला आहे, कारण या नियोजनात महागाईचा विचारच केलेला नाही.
महागाईमुळे पैशाचे मूल्य होतंय कमीआर्थिक तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, बँकेत पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो. परंतु, त्याची खरेदी करण्याची क्षमता हळूहळू कमी होत राहते—जसे टायरमधून हवा हळू हळू बाहेर पडते. जर सरासरी महागाई दर ५% मानला, तर २० वर्षांत पैशाचे मूल्य अर्धे होते. याचा अर्थ, आज ज्या वस्तूसाठी तुम्ही १ कोटी रुपये खर्च कराल, २० वर्षांनंतर त्याच वस्तूसाठी तुम्हाला दुप्पट पैसे (म्हणजेच आजच्या ₹५० लाखाइतके मूल्य) खर्च करावे लागतील.
निवृत्त लोकांसाठी FD का पुरेशी नाही?बहुतेक निवृत्त लोक जोखीम टाळण्यासाठी आपले सर्व पैसे एफडीमध्ये ठेवतात. आजकाल लोक खूप लांब आयुष्य जगत आहेत. ६५ वर्षांचा व्यक्ती पुढे २० ते २५ वर्षे जगू शकतो. अशा परिस्थितीत, फक्त एफडीवर अवलंबून राहिल्यास भविष्यातील गरजा भागवणे कठीण होते. एफडी तुमची मूळ रक्कम सुरक्षित ठेवते, पण तुमच्या जीवनशैलीला आणि वाढत्या खर्चांना महागाईपासून वाचवू शकत नाही.
सुरक्षित आणि हुशार गुंतवणूक योजना काय आहे?आर्थिक सल्लागारांनी निवृत्त व्यक्तीला संतुलित पोर्टफोलिओ बनवण्याचा सल्ला दिला. यामध्ये
- ७०% रक्कम बाँड्समध्ये : यामुळे नियमित आणि स्थिर परतावा मिळत राहील.
- २०% रक्कम उत्तम लाभांश देणाऱ्या स्टॉक्समध्ये: यामुळे दीर्घकाळात पैशात चांगली वाढ होईल.
- १०% रक्कम लिक्विड फंड्समध्ये : जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लगेच पैसा वापरता येईल.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही योजना अति-जोखीमपूर्ण नाही, तर महागाईपासून बचाव करताना तुमचे पैसे सतत कामावर लावते. कारण सत्य हेच आहे की, कोणतीही गुंतवणूक १००% जोखीममुक्त नसते, आणि रोख पैसाही वेळेनुसार आपले मूल्य गमावतो.
वाचा - ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Relying solely on fixed deposits endangers retirement savings. Inflation erodes value; diversify investments with bonds, stocks, and liquid funds for financial security. A balanced portfolio is key.
Web Summary : केवल सावधि जमा पर निर्भर रहना सेवानिवृत्ति बचत को खतरे में डालता है। मुद्रास्फीति मूल्य को कम करती है; वित्तीय सुरक्षा के लिए बांड, स्टॉक और तरल फंड के साथ निवेश में विविधता लाएं। संतुलित पोर्टफोलियो महत्वपूर्ण है।