Join us

८०-२० फॉर्म्युल्याने बदलेल तुमचं आयुष्य! इटलीच्या महान अर्थशास्त्रज्ञाने १९व्या शतकात लावला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:33 IST

What is 80-20 Formula : इटलीच्या महान अर्थशास्त्रज्ञाने १९ व्या शतकात हा फॉर्म्युला तयार केला आहे. पॅरेटो प्रिन्सिपल असं अर्थतज्ञाचे नावं होतं.

What is 80-20 Formula : कमी वयात आर्थिक स्वतंत्र व्हायचं असेल तर आतापासून तुमच्या पैशाचं नियोजन करणे आवश्यक आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय. किंवा काहीतरी नवीन सुरू करण्याचा डोक्यात विचार असेल. तर तुमच्या आयुष्यात फक्त एक सूत्र अंमलात आणा. याला पॅरेटो प्रिन्सिपल किंवा ८०-२० फॉर्म्युला म्हणतात. या एकमेव सूत्रात तुमचे जीवन बदलण्याची ताकद आहे. मग ते गुंतवणुकीद्वारे चांगले परतावा मिळवणे असो किंवा स्वतःचा व्यवसाय उघडून त्यात यश मिळवणे असो. ८०-२० चा हा फॉर्म्युला तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये नेहमीच यशाची खात्री देईल.

या सुत्रानुसार, तुमच्या आयुष्यातील ८० टक्के परिणाम हे मुख्यतः २० टक्के केलेल्या कामातून येत असतात. हे सोपं वाटणारे शक्तिशाली सूत्र तुमच्या आयुष्यात गेमचेंजर ठरू शकते. हे पर्सनल फायनान्स किंवा गुंतवणुकीत लागू केल्यास, तुमचे कधीही नुकसान होणार नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला लाईफ बॅलन्सबद्दलही बरेच काही सांगतो.

इटालियन अर्थशास्त्रज्ञाचा फॉर्म्युलाया सिद्धांताला इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटो यांचे नाव देण्यात आले आहे. पॅरेटोला १९व्या शतकात लक्षात आलं की इटलीतील ८० टक्के जमीन केवळ २० टक्के लोकांच्या ताब्यात आहे. हेच सूत्र त्याने इतर गोष्टींवर लागू केले. तर तिथे त्याला धक्कादायक निष्कर्ष मिळाले. मग ती गुंतवणूक असो, निर्णय असो किंवा व्यवसाय असो. पॅरेटो यांनी सर्वत्र यशाचा एकच फॉर्म्युला बनवला.

४ गोष्टींची विशेष काळजी घ्यापॅरेटो यांचा फॉर्म्युला सांगतो की तुमचा ८० टक्के परतावा फक्त २० टक्के गुंतवणुकीतून येतो.तुमचा २० टक्के खर्च हा तुमच्या ८० टक्के आर्थिक गळती आणि अनावश्यक खर्चाचे मुख्य कारण बनतो.जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचे २० टक्के ग्राहक तुमच्या ८० टक्के उत्पन्नाचे स्त्रोत असतात हे लक्षात ठेवा.तुमची २० टक्के योग्य गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमची आर्थिक धोरणे काळजीपूर्वक निवडावी लागतील.त्यांनी सांगितले की त्या २० टक्के कौशल्य, ग्राहक किंवा उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, जे तुमचं ८० टक्के उत्पन्न वाढवू शकतं..

कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळेलपेरेटो म्हणतात की कर्ज तुमच्या आर्थिक यशात मोठा अडथळा म्हणून काम करते. सर्वात जास्त व्याज आकारणारी २० टक्के कर्जे ओळखा. यामध्ये क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज सर्वाधिक व्याजदर आकारतात. म्हणून, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या उच्च व्याजाच्या कर्जाची परतफेड करावी. सर्व कर्ज एकाच ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न करावा. 

टॅग्स :गुंतवणूकव्यवसायशेअर बाजारनोकरी