Join us

अवघ्या ४५ व्या वर्षी २.२७ कोटींचा फंड होईल जमा; निवृत्तीसाठी असं करा गुंतवणुकीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:53 IST

Personal Finance Tips : सेवानिवृत्तीनंतर आर्थिक तरतूद कशी करावी? याची चिंता सतावत असेल तर तुम्हाला आजपासून गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी.

Personal Finance Tips : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक तरतूद कशी करायची? याची कायम चिंता असते. मात्र, आतापासूनच जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमची चिंता कायमची दूर होईल. यासाठी आर्थिक सल्लागारांनी एक फॉर्म्युला दिला आहे. १५x१५x१५ हा फॉर्म्युला तुम्हाला निवृत्तीच्या नियोजनात खूप उपयोगी पडेल.

१५x१५x१५ फॉर्म्युला काय आहे?१५x१५x१५ च्या फॉर्म्युलामध्ये, तुम्हाला १५% सरासरी परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडात १५ वर्षे दरमहा १५,००० ची एसआयपी करावी लागेल. जर तुम्ही या फॉर्म्युल्यासह एसआयपी केली तर तुम्ही निवृत्तीपूर्वीच करोडपती व्हाल. या फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही फक्त १५ वर्षांत १.०१ कोटी रुपये जमा करू शकता. या पैशातून तुम्ही घर खरेदी करू शकता किंवा तुमच्या निवृत्ती निधीसाठी ठेवू शकता.

निवृत्तीवेळी कोट्यधीश तुम्ही ही गुंतवणूक १५ ऐवजी २० वर्षे चालू ठेवल्यास तुमच्याकडे २.२७ कोटी रुपयांचा निधी जमा होईल. समजा तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली, तर वयाच्या ६०व्या वर्षी म्हणजेच निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे २.२७ कोटी रुपयांचा निधी असेल. आर्थिक नियोजनात वेळेला खूप महत्त्व आहे. तुम्ही जितके कमी वयात गुंतवणूक सुरू कराल तेवढाच जास्त फायदा तुम्हाला होईल. जर तुम्ही वयाच्या २५व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या ४५ व्या वर्षी तुमच्याकडे २.२७ कोटी रुपये जमा झाले असतील. 

निवृत्तीचे नियोजन कसे करावे?

  • निवृत्तीसाठी तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त निधी जमा करू शकाल. तरुण वयात गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला चक्रवाढीचा (कंपाऊंडिंग) फायदा मिळतो.
  • निवृत्तीनंतर तुम्हाला किती खर्च लागेल, याचा अंदाज घ्या. महागाई लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करा.
  • निवृत्तीसाठी योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचे पर्याय निवडताना जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घ्या. म्युच्युअल फंड, इक्विटी, पीपीएफ, एनपीएस यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करा.
  • निवृत्तीसाठी नियमितपणे गुंतवणूक करा. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार