Join us

स्विगी-झोमॅटोपेक्षा स्वस्त; अभिनेता सुनिल शेट्टीने लॉन्च केले स्वस्त फूड डिलिव्हरी App

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 16:05 IST

Food Delivery App : सुनिल शेट्टीने 'वायू' नावाचे app लॉन्च केले आहे. जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती...

Suniel Shetty Food Delivery App : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने नवीन फूड डिलिव्हरी अॅप लॉन्च केले आहे. या अॅपची खास गोष्ट म्हणजे या अॅपमध्ये झोमॅटो आणि स्विगी पेक्षा स्वस्त फूड देण्याचा दावा केला जात आहे. 'वायू' असे या अॅपचे नाव आहे, जे मुंबईतील हॉटेल्सनी आणले आहे. या अॅपबद्दल असा दावा केला जात आहे की, इतर अॅग्रीगेटरच्या तुलनेत हे अॅप 15 ते 20 टक्के स्वस्त अन्न देईल.

कोणी लॉन्च केले अॅप? वायू अॅप हे Destec Horeca चा एक भाग आहे, ज्याची स्थापना उद्योजक अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी केली आहे. वायुला मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) आणि इतर उद्योग संस्थांनी पाठिंबा दिला आहे. भगत ताराचंद, महेश लंच होम, केळीचे पान, शिवसागर, गुरु कृपा, कीर्ती महल, फारसी दरबार आणि लाडू सम्राट यासह 1,000 हून अधिक मुंबई रेस्टॉरंट्स प्लॅटफॉर्मशी जोडलेली आहेत. कंपनीने अभिनेता आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी यांची वायुचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

अॅप रेस्टॉरंटकडून कमिशन घेणार नाहीअहवालानुसार, WAAYU रेस्टॉरंट्सकडून कोणतेही कमिशन शुल्क आकारत नाही. यामुळे, रेस्टॉरंट्स ग्राहकांना चांगल्या किमतीत जेवण देऊ शकतात. यामुळे वायूचे फूड डिलिव्हरी इतर अॅप्सपेक्षा स्वस्त असेल. प्लॅटफॉर्मचा उद्देश ग्राहकांना परवडणारे, वेळेवर, आरोग्यदायी आणि उत्तम दर्जाचे अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. अलीकडेच वायू लॉन्च झाले असून, स्वस्त अन्नही डिलिव्हर करत आहे. हा देखील ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक मार्ग असू शकतो. आता कंपनी या ऑफरवर किती काळ टिकून राहील, हे येणारा काळच सांगेल. तुम्ही हे अॅप Google Play Store वरुन आणि waayu.app वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

टॅग्स :सुनील शेट्टीव्यवसायस्विगीझोमॅटो