Join us

UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:50 IST

UPI Payment : सध्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजकाल प्रत्येकजण कोणत्याही पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करणं पसंत करतो.

सध्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजकाल प्रत्येकजण कोणत्याही पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करणं पसंत करतो. हे सुरक्षित तर आहेच यासह, युझर्स सेकंदात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यामुळे त्यांना रोख ठेवण्याची आवश्यकता भासत नाही आणि वेळेचीही बचत होते. त्याचबरोबर यूपीआय पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. भारताव्यतिरिक्त मालदीव, श्रीलंकेसह अनेक देशांमध्येही यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, यूपीआय पेमेंटशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

इंटरनेटशिवाय किती पैसे देता येतील?

जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल आणि तुम्हीही यूपीआयच्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्ही इंटरनेटशिवायही यूपीआय पेमेंट करू शकाल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) यूपीआय १२३ पेद्वारे फीचर फोन आणि स्मार्टफोन युझर्ससाठी डिजिटल पेमेंट अधिक सोपं केलं आहे. आता तुम्ही इंटरनेटशिवायही यूपीआय १२३ पेद्वारे १०,००० रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.

'या' ४ पद्धतीनं विना इंटरनेट होतं पेमेंट

  • ज्या युजर्सकडे स्मार्टफोन नाही ते आयव्हीआरद्वारे (Interactive Voice Response) व्हॉईस पेमेंट करू शकतात. यासाठी त्यांना ठराविक आयव्हीआर नंबरवर कॉल करावा लागेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या कीपॅडमधून योग्य पर्याय निवडून पेमेंट करू शकता.
  • दुसरी पद्धत म्हणजे प्रॉक्सिमिटी साउंड-बेस्ड पेमेंट्स. याअंतर्गत तुम्ही तुमच्या फोनच्या जवळच्या डिव्हाइसमधून (POD) येणाऱ्या स्पेशल टोनद्वारे पेमेंट करू शकता. आपण या डिव्हाइसवर आपला फोन टॅप करून पैसे देऊ शकता.
  • याशिवाय युजर्स मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही पैसे भरू शकतात. यासाठी तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. या कॉलमध्ये तुम्ही तुमचा यूपीआय पिन टाकून ट्रान्झॅक्शन कन्फर्म करू शकता.
  • तर चौथा पर्याय फीचर फोन युजर्ससाठी आहे. आपण आपल्या फोनमध्ये अॅपद्वारे यूपीआय पेमेंट करू शकता.
टॅग्स :पैसा