Union Bank of India FD Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेव हा आजही सर्वसामान्यांचा पहिला पसंतीचा पर्याय आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज युनियन बँक ऑफ इंडियाने आपली नवीन 'स्पेशल ४४४ दिवस' मुदत ठेव योजना लाँच केली आहे. या योजनेत बँक आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी संधी ठरत आहे.
व्याजदरांचे सविस्तर गणितयुनियन बँकेने ४४४ दिवसांच्या या विशेष कालावधीसाठी वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी खालीलप्रमाणे व्याजदर निश्चित केले आहेत.
- सामान्य नागरिक : ६.६०% वार्षिक व्याज.
- ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) : ७.१०% वार्षिक व्याज.
- अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) : ७.३५% वार्षिक व्याज.
२ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा?जर तुम्ही या ४४४ दिवसांच्या विशेष योजनेत २ लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल.
| नागरिक प्रवर्ग | गुंतवणुकीची रक्कम | मिळणारे व्याज | एकूण मॅच्युरिटी रक्कम |
| सामान्य नागरिक | २,००,००० | १६,५७७ | २,१६,५७७ |
| ज्येष्ठ नागरिक | २,००,००० | १७,८७६ | २,१७,८७६ |
| अति ज्येष्ठ नागरिक | २,००,००० | १८,५२८ | २,१८,५२८ |
सुरक्षिततेचा हमीभावशेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या काळात बँक एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. युनियन बँकेच्या या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, यात तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी निश्चित व्याजदरासह तुमचे पूर्ण भांडवल सुरक्षितपणे परत मिळते. ज्या गुंतवणूकदारांना दीड ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही ४४४ दिवसांची योजना अत्यंत फायदेशीर आहे.
वाचा - गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक युनियन बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन किंवा मोबाइल बँकिंग/इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Web Summary : Union Bank launches a special 444-day FD scheme with attractive interest rates. Senior citizens benefit from higher returns. A ₹2 lakh investment yields up to ₹18,528 interest for super senior citizens. Secure investment option amidst market volatility.
Web Summary : यूनियन बैंक ने आकर्षक ब्याज दरों के साथ 444 दिनों की विशेष एफडी योजना शुरू की। वरिष्ठ नागरिकों को अधिक लाभ। ₹2 लाख के निवेश पर अति वरिष्ठ नागरिकों को ₹18,528 तक ब्याज मिलता है। बाजार की अस्थिरता के बीच सुरक्षित निवेश विकल्प।