Join us

Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:35 IST

Gold-Silver Price after Operation Sindoor: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. पाहा काय आहेत सोन्याचे दर.

Gold-Silver Price after Operation Sindoor: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव एका झटक्यात १२९३ रुपयांनी महाग होऊन ९३,६५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी १०१६ रुपयांनी वधारून ९५,५८८ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास हे दर जारी केले जातात.

ऑपरेशन सिंदूरनंतर घसरण

६-७ मे च्या रात्री पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात सुरू असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ७ मे रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव ९९,४९३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ९६,१३३ रुपये प्रति किलो होता. चार दिवसांनंतर शस्त्रसंधी झाली आणि या दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार झाले. आतापर्यंत सोने ३८८५ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात ५४५ रुपयांची घसरण झाली.

एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; र‍ियल टाइम फ्रॉड ड‍िटेक्‍शन होणार, सगळे अॅप्स ट्रॅक करणार

जीएसटीसबत किंमत काय?

जीएसटीसह आज सोनं ९६४६७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९८,४५५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सराफा बाजारात सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ५४४२ रुपयांनी स्वस्त झालं. तर २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १२८८ रुपयांनी वाढून ९३,२८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ११८७ रुपयांनी वाढून ८५,७९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १८ कॅरेट सोन्याच्या दरात 970 रुपयांनी वाढ झाली असून ७०,२४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ७६५ रुपयांनी घसरून ५४,७९० रुपये झाला आहे.

टॅग्स :सोनंचांदी