PF Investment : केंद्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी PF योजना सुरू केली होती. सरकारी कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. परंतु, ईपीएफओने विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना तयार केली होती. या योजनेत, कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा केली जाते. संबंधित कंपनीदेखील तेवढीच रक्कम जमा करते. जर एखाद्याचा पगार ५० हजार रुपये असेल, तर तो या योजनेतून ५ कोटी रुपयांचा निधीही उभारता येतो.
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वृद्धापकाळात आधार मिळावा, यासाठी ईपीएफओने पीएफ योजना तयार केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगारातून १२ टक्के योगदान जमा केले जाते. यावरील व्याज ईपीएफओ ठरवते. पीएफवरील व्याजदर ईपीएफओने सुधारित केले आहे. पूर्वी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना दरवर्षी पीएफवर ८.१५ टक्के व्याज देत असे, जे आता वाढून ८.२५ टक्के झाले आहे.
असा जमा होईल ५ कोटींचा फंडजर तुम्ही अशा कंपनीत काम करत असाल, जिथे २० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तर सरकारी नियमांनुसार ती कंपनी पीएफ फंडात गुंतवणूक करेल. आता समजा तुमचा दरमहा मूळ पगार ५० हजार रुपये आहे आणि तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी काम सुरू केले. तर ईपीएफओच्या नियमांनुसार कंपनी तुमच्या पगाराच्या १२ टक्के पीएफमध्ये टाकेल आणि तेवढीच रक्कम स्वतः जमा करेल. जर पगार दरवर्षी १० टक्के वाढला, तर ८.२५ टक्के व्याजानुसार निवृत्तीनंतर, म्हणजेच ५८ वर्षांनंतर तुमच्याकडे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम असेल.
(टीप-कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)