Join us

५५ हजारांचं स्वप्न भंगलं, दर अवाक्याबाहेर; झटक्यात सोनं ₹२९१३ रुपयांनी महागलं, पाहा नवी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:45 IST

Gold Silver Price 11 April: लग्नसराईच्या सीझनपूर्वी सोनं खरेदी करणाऱ्याला आज मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी शुल्कात ९० दिवसांची सवलत दिल्यानंतर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय.

Gold Silver Price 11 April: लग्नसराईच्या सीझनपूर्वी सोनं खरेदी करणाऱ्याला आज मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी शुल्कात ९० दिवसांची सवलत दिल्यानंतर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय. आज, ११ एप्रिल रोजी सोन्यानं ९३,०७४ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. एका झटक्यात सोन्याच्या दरात २९१३ रुपयांची वाढ झाली. तर चांदी १९५८ रुपयांनी महागून ९२,६२७ रुपये झाली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ९५,८६६ रुपये आणि चांदीचा भाव ९५,४०५ रुपये झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भावही ८५,२०० रुपयांवर

आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव आता २९०१ रुपयांनी महाग झाला असून तो ९२,७०१ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २६८ रुपयांनी वाढून ८५,२५६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २१८५ रुपयांनी वाढून ६९,८०६ रुपये झाला आहे.

मध्यमवर्गीयांनी कसं बनावं श्रीमंत? झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

५५ हजारांचं स्वप्न भंगलं

५५ ते ५० हजार रुपयांपर्यंत सोन्याच भाव येण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आज मोठा धक्का बसला आहे. सोन्याच्या भाववाढीची कारणं स्पष्ट करताना तज्ज्ञ अजय केडिया म्हणतात की, सोन्याला आधार देणारे घटक अजूनही वर्चस्व गाजवत आहेत. जसं की भूराजकीय तणाव (युद्ध, तणाव), डी-डॉलरायझेशन, मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ खरेदी सुरू आहे. शेअर बाजारातील घसरणीसह महागाई आणि मंदीचीही भीती आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेत आहेत. यामुळे सोनं महाग होत आहे.

टॅग्स :सोनंचांदी