Join us

TCSच्या सीईओंना मिळाले ₹26.52 कोटींचे पॅकेज, पण इतर कंपन्यांच्या CEO पेक्षा खूप कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:29 IST

TCS : टीसीएसच्या सीईओंना मिळालेला पगार कंपनीच्या 6.07 लाख कर्मचाऱ्यांपेक्षा 330 पट जास्त आहे.

TCS : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे CEO आणि MD के. कृतिवासन यांना आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 26.52 कोटी रुपये पगार मिळाला आहे. हा 2023-24 च्या आर्थिक वर्षापेक्षा 4.6 टक्के जास्त आहे. कृतिवासन यांच्या पगारात 1.39 कोटी रुपये पगार, 2.13 कोटी रुपये इतर फायदे, भत्ते आणि सुविधा अन् 23 कोटी रुपये कमिशनचा समावेश आहे.

आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या सीईओंचे पगारआर्थिक वर्ष 2024 पर्यंत एचसीएल टेकचे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी सीईओ होते. विजयकुमार यांना 84.16 कोटी रुपयांचे पगार पॅकेज मिळाले. तर, इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी आर्थिक वर्ष 24४ मध्ये 66.25 कोटी रुपये कमावले, तर विप्रोचे नवनियुक्त सीईओ श्रीनी पल्लिया यांना 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले. 

कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा 330 पट जास्तटीसीएसच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, कृतिवासन यांना मिळणारा पगार हा कंपनीने त्यांच्या 6.07 लाख कर्मचाऱ्यांना दिलेल्या सरासरी पगाराच्या सुमारे 330 पट जास्त आहे. तर, टीसीएसचे सीएफओ समीर सेक्सारिया यांच्या एकूण पगारात 7.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या मते, पदोन्नतीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी वार्षिक वाढ 5.5 ते 7.5 टक्क्यांच्या दरम्यान होती. या वर्षी 1.1 लाख कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.

आरती सुब्रमण्यम यांना किती पगार मिळतोटीसीएसच्या वार्षिक अहवालात असेही म्हटले आहे की, नवनियुक्त अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम यांना दरमहा 10.8८ लाख रुपये पगार दिला जाईल. अहवालानुसार, TCS ने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रिचर्च अँड डेव्हलपमेंट आणि नवोपक्रमावर 2,630 कोटी रुपये खर्च केले, तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही रक्कम 2751 कोटी रुपये होती. 

टॅग्स :कर्मचारीनोकरीगुंतवणूकव्यवसाय