Tax Free Income Schemes: आजच्या काळात बचतीचं महत्त्व किती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गुंतवणूकदारानं केवळ आपले आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठीच नव्हे, तर कर वाचवण्याच्या मार्गांचा विचार करूनही गुंतवणूक करणं आवश्यक आहे. येथे आपण अशा काही सरकारी योजनांची माहिती घेणार आहोत, ज्या तुम्हाला केवळ चांगला परतावाच देत नाहीत, तर कर वाचवण्यासाठीही मोठी मदत करतात.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
पीपीएफ म्हणजेच 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' ही एक अत्यंत लोकप्रिय सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना 'EEE' (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीमध्ये येते. 'EEE' चा अर्थ असा की- गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम या तिन्हींवर कोणताही कर आकारला जात नाही. याचाच अर्थ, पीपीएफ योजनेवर तुम्हाला एक रुपयाचाही कर भरावा लागणार नाही. सध्या या योजनेवर ७.१ टक्के दरानं व्याज मिळत असून पीपीएफ खाते १५ वर्षांनी मॅच्युअर होतं.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) देखील पूर्णपणे करमुक्त आहे. ही योजना देखील 'EEE' श्रेणीत मोडते. या योजनेअंतर्गत मुलींना ८.२ टक्के दरानं मोठं व्याज दिलं जात आहे. सध्या इतर कोणत्याही योजनेत मुलींच्या नावे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज दिलं जात नाही. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)
वरील योजनांच्या व्यतिरिक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही देखील एक महत्त्वाची योजना आहे, जी पूर्णपणे करमुक्त नसली तरी बहुतेक लोकांना याचा लाभ मिळतो. १ एप्रिल २०२१ पासून लागू असलेल्या नियमानुसार, जर ईपीएफमध्ये कर्मचाऱ्याचं वार्षिक योगदान २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला एक रुपयाचाही कर द्यावा लागणार नाही. मात्र, जर हे योगदान २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर व्याजावर कर भरावा लागेल. ईपीएफओनं (EPFO) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफ खात्यांवर ८.२५ टक्के व्याजदराची शिफारस केली आहे, जो गेल्या वर्षीच्या व्याजदराइतकाच आहे.
Web Summary : PPF, SSY, and EPF offer tax benefits. PPF and SSY are fully tax-free under the EEE category. EPF offers tax exemption on contributions up to ₹2.5 lakh annually. These schemes provide good returns while saving tax.
Web Summary : पीपीएफ, एसएसवाई और ईपीएफ कर लाभ प्रदान करते हैं। पीपीएफ और एसएसवाई ईईई श्रेणी के तहत पूरी तरह से कर-मुक्त हैं। ईपीएफ सालाना ₹2.5 लाख तक के योगदान पर कर छूट प्रदान करता है। ये योजनाएं कर बचाने के साथ-साथ अच्छा रिटर्न भी देती हैं।