Join us

नवीन वर्षात आर्थिक स्वातंत्र्यासाठी हे 5 'संकल्प' करा, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:03 IST

financial freedom : या वर्षी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करून गुंतवणूक सुरू करा. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. त्यांचे पालन करून तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता.

financial freedom : आजपासून जगभरात नवीन वर्षाला सुरुवात झाली. अनेकजण या दिवसांपासून अनेक संकल्प सोडतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगत आहोत. तुमच्या संकल्पात त्यांचा समावेश करून तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूतच नाही तर तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. पैशाची कमतरता कायमची दूर होईल. या वर्षी तुम्ही असे ५ संकल्प घ्यावेत जे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देतील.

मी SIP कधीही मोडणार नाहीशेअर बाजारात चढ-उतारांचा टप्पा सुरूच असतो. या काळात अनेक गुंतवणूकदारांनी त्यांची एसआयपी थांबवली आहे. मात्र, हे चुकीचे आहे. या वर्षी पहिला संकल्प घ्या की तुम्ही तुमची SIP कधीही बंद करणार नाही. जेव्हा बाजार अस्थिर असेल तेव्हाच तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगले परतावा मिळतो.

मी गरजेनुसार विमा संरक्षण घेईन सध्याच्या काळात कधी काय होईल याची शास्वती नाही. अशा परिस्थितीत कोणतेही आर्थिक संकट येऊ नये यासाठी दर ५ वर्षांनी आरोग्य आणि जीवन विम्याचे पुनरावलोकन केले पाहिजे. या वर्षी तुमच्याकडे पुरेसे विमा संरक्षण असल्याची खात्री करा. नसेल तर पूर्ण करा.

कर्जाच्या सापळ्यात पडणार नाहीतिसरा संकल्प तुम्ही घ्यावा की तुम्ही कर्जाच्या फंदात पडणार नाही. आजची तरुणाई आपल्या गरजा नव्हे तर छंद पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या खाईत अडकत आहे. या वर्षी तुम्ही ही चूक करणार नाही.

आर्थिक नियोजनया वर्षी तुम्ही तुमच्या आगामी गरजा आणि बचतीसाठी निश्चितपणे आर्थिक योजना कराल. असे केल्याने तुम्ही तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल. हे तुमचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

लोभाला बळी पडणार नाही झटपट पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी आजकाल अनेक जण फसवणुकीचे बळी ठरले आहेत. तुम्ही संकल्प करा की तुम्ही असे कोणतेही काम करणार नाही. अशा कुठल्याही अनाधिकृच ठिकाणी मोठ्या गुंतवणुकीच्या आशेने पैसे गुंतवणार नाही. 

टॅग्स :गुंतवणूकनववर्षाचे स्वागतशेअर बाजार