Join us

सनी लिओनीची नव्या क्षेत्रात एन्ट्री; मुंबईतील अलिशान भागात खरेदी केली प्रॉपर्टी; किंमत वाचून अवाक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:28 IST

Sunny Leone : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईतील एका अलिशान भागात प्रॉपर्टी घेतली आहे. सुमारे २ हजार स्केअर फूट असलेल्या या जागेची किंमत वाचून डोळे पांढरे होतील.

Sunny Leone : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या आयटम साँगसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दशकभरापासून सनीने हिंदी चित्रपट सृष्टीत चांगलं बस्ताव बसवलं आहे. तिने अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. ४३ वर्षीय सनी लिओनीने आता नवीन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मुंबईतील ओशिवरा येथे ८ कोटी रुपये किमतीचे अलिशान कार्यालय खरेदी केले आहे. या प्रॉपर्टीत अनेक बड्या स्टार्सनेही गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

सनी लिओनीची प्रॉपर्टी नेमकी कुठे आहे?​​सनी लिओनीने खरेदी केलेली ही मालमत्ता वीर सिग्नेचरमध्ये आहे, जो ओशिवरा येथील वीर ग्रुपचा व्यावसायिक प्रकल्प आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळील ठिकाण उत्तम जीवनशैली आणि कनेक्टिव्हिटीसाठी ओळखले जाते. सनीने खरेदी केलेल्या ऑफिस स्पेसचा कार्पेट क्षेत्र १,९०४.९१ स्क्वेअर फूट आणि बांधकाम क्षेत्र २,०९५ स्क्वेअर फूट आहे. प्रॉपर्टीत ३ कार स्पेस देखील आहेत. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी ३५.०१ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले असून त्याची नोंदणी शुल्क ३०,००० रुपये आहे.

सनीने या बॉलिवूड निर्मात्याची प्रॉपर्टीही खरेदी केलीचित्रपट निर्माते आनंद कमलनयन पंडित आणि रूपा आनंद पंडित यांच्या मालकीची एक प्रॉपर्टीही सीने खरेदी केली आहे. ऐश्वर्या प्रॉपर्टी अँड इस्टेटमध्ये ही ऑफिसची जागा आहे. आनंद पंडित हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता, वितरक आणि रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. त्यांनी टोटल धमाल, चेहरे आणि द बिग बुल यांसारख्या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले आहेत.

वीर सिग्नेचरमध्ये अनेक बड्या स्टार्सची गुंतवणूकमुंबईतील अलिशान वीर सिग्नेचर प्रॉपर्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सने पैसे गुंतवले आहेत. वीर ग्रुपचा हा प्रकल्प ०.५३ एकरमध्ये पसरलेला व्यावसायिक प्रकल्प आहे. स्क्वेअर यार्ड्स प्रोजेक्ट डेटा इंटेलिजन्सनुसार, जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान वीर सिग्नेचरमध्ये एकूण १२ मालमत्ता खरेदी करण्यात आल्या, ज्याची किंमत २०२ कोटी रुपये आहे. वीर सिग्नेचरमध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगन, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांसारख्या अनेक बॉलीवूड स्टार्सचीही मालमत्ता आहे.

टॅग्स :सनी लियोनीमुंबईबांधकाम उद्योगगुंतवणूक