Join us

Stock Markets Today: मंथली एक्सपायरीवर निफ्टीत तेजी, सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ; IT Stocks सुस्साट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:00 IST

Stock Markets Today: शेअर बाजारासाठी आज निफ्टीची मंथली एक्सपायरी असून आज बाजाराची जोरदार सुरुवात झाली आहे. ओपनिंगला निफ्टी १०० अंकांनी वधारून २४,८६० च्या वर व्यवहार करत होता.

Stock Markets Today: शेअर बाजारासाठी आज निफ्टीची मंथली एक्सपायरी असून आज बाजाराची जोरदार सुरुवात झाली आहे. ओपनिंगला निफ्टी १०० अंकांनी वधारून २४,८६० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारला आणि तो ८१७५१ च्या आसपास होता. बँक निफ्टीही २५० अंकांनी वधारला. अमेरिकेतून टॅरिफबाबतच्या बातम्यांमुळे आयटी आणि मेटल शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टीवरील आयटी निर्देशांक १ टक्क्यांच्या वर होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही कमालीची तेजी आली.

जर आपण सुरुवातीच्या पातळीकडे पाहिलं तर, सेन्सेक्स २७९ अंकांनी वाढून ८१,५९१ वर उघडला. निफ्टी ४३ अंकांनी वाढून २४,८२५ वर उघडला. आणि बँक निफ्टी १५४ अंकांनी वाढून ५५,५७१ वर उघडला. चलन बाजारात, रुपया १४ पैशांनी कमकुवत होऊन ८५.५०/ डॉलर्सवर उघडला.

FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई?

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

सेन्सेक्सवर इन्फोसिस, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, सन फार्मा, टीसीएस यांचे शेअर्स वधारले. तर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी यांचे शेअर्स घसरले. निफ्टीमध्ये इन्फोसिसचे शेअर्सही सर्वाधिक वधारले. जेएसडब्ल्यू स्टील, ट्रेंट, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक, टाटा स्टील यांचे शेअर्सही वाढले. अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर, बजाज फिनसर्व्ह, जिओ फायनान्शियल्स यांचे शेअर्स घसरले.

जागतिक बाजारातून संकेत काय?

आज अमेरिकेच्या फ्युचर्सकडून जोरदार संकेत येत आहेत. खरंतर, टॅरिफच्या बाबतीत एक अतिशय आश्चर्यकारक आणि मोठी बातमी आली आहे. अमेरिकन कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्युत्तरात्मक टॅरिफवर स्थगिती दिली आहे आणि राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराबाहेर निर्णय घेतल्याचं म्हटलं. प्रत्युत्तरात्मक टॅरिफवर कोर्टाच्या स्थगितीमुळे, डाऊ फ्युचर्स ५०० अंकांनी वाढले, तर गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी वाढून २४८०० च्या वर होता. निक्केई ५५० अंकांनी वधारला होता. काल, अमेरिकन बाजारांनी त्यांचे सुरुवातीची तेजी गमावली आणि घसरणीसह बंद झाले. डाऊ २५० अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक १०० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजार