Join us

३०, ४० किंवा ५० व्या वर्षीही निवृत्तीचे नियोजन करू शकता; 'या' गुंतवणुकीच्या टिप्स तुम्हाला बनवतील कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:42 IST

Retirement Planning : वयाच्या ३०, ४० आणि ५० व्या वर्षी योग्य गुंतवणूक धोरणाचे पालन करून, तुम्ही कोणत्याही आर्थिक ताणाशिवाय तुमच्या निवृत्तीचा आनंद घेऊ शकता.

Retirement Planning : आता पूर्वीसारखं वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होण्याचे दिवस इतिहास जमा झाले आहेत. सध्याच्या पिढीचा लवकर निवृत्त होण्याकडे कल वाढला आहे. तुम्हीही लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असाल, तर योग्य वेळी निवृत्ती नियोजन सुरू करणे महत्त्वाचं आहे. योग्य नियोजन करून तुम्ही कोट्यवधींचा निधी तयार करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जीवन जगू शकता. वयाच्या ३०, ४० आणि ५० व्या वर्षी योग्य गुंतवणूक धोरण वापरून, तुम्ही कोणत्याही आर्थिक ताणाशिवाय तुमच्या निवृत्तीचा आनंद घेऊ शकता.

वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्तीचे नियोजन कसे करावे?निवृत्तीसाठी बचत सुरू करण्यासाठी ३० वर्षे हे सर्वोत्तम वय आहे. या वयात तुमच्याकडे वेळ ही सर्वात मोठी शक्ती असते. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका भविष्यात तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला आयुष्यभर जास्त कष्ट करावे लागणार नाहीत.इक्विटी म्युच्युअल फंड आणि एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करा. एसआयपी सरासरी १२ टक्के परतावा देते, ज्यामुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.विमा योजना देखील विचारात घ्या.एनपीएसमध्ये खाते उघडूनही तुम्ही गुंतवणूक करू शकता.

वयाच्या ४० व्या वर्षी निवृत्तीचे नियोजन कसे करावे?वयाच्या ४० व्या वर्षी पोहोचताच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि आरोग्याच्या चिंताही वाढू लागतात. अशा परिस्थितीत, निवृत्तीचे नियोजन प्रत्येकासाठी आवश्यक बनते.या वयात, एसआयपी द्वारे शक्य तितकी जास्त गुंतवणूक करा.एनपीएस आणि ईपीएफचा देखील योग्य वापर करा.

वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्तीचे नियोजन कसे करावे?तुमची निवृत्ती फक्त १० वर्षांवर असेल, तर निधी जमा करण्याचे आव्हान वाढते. या वयात गुंतवणूक करण्याची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते.स्थिर परतावा देणारे गुंतवणूक पर्याय निवडा.हळूहळू तुमच्या इक्विटी गुंतवणुकीचा काही भाग 'सुरक्षित' कर्ज साधनांमध्ये गुंतवण्यास सुरुवात करा, पण इक्विटीमधून पूर्णपणे बाहेर पडू नका. महागाईपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ वाढवा.एनपीएस, पीपीएफ आणि एफडीवर लक्ष केंद्रित करा. याद्वारे तुम्ही ६० वर्षांसाठी एक मोठा निधी तयार करू शकता.

वाचा - गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!

योग्य वयात योग्य गुंतवणूक करून तुम्ही लवकर निवृत्त होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त जीवन जगू शकता.

टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूकपीपीएफशेअर बाजार