SIP Investment: आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). दरमहा थोडीथोडी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा निधी उभारण्याची क्षमता SIP मध्ये आहे. विशेषतः ६० वर्षांपर्यंत १ कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड तयार करायचा असेल, तर गुंतवणूक किती लवकर सुरू केली जाते, याला फार मोठे महत्त्व आहे.
तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीचा खरा खेळ फक्त मोठ्या रकमेचा नसून वेळेचा आहे. सुरुवात जितकी लवकर, तितका फायदा जास्त.
२५ व्या वर्षी सुरुवात केल्यास काय होऊ शकते?
जर एखाद्या व्यक्तीने २५ व्या वर्षी SIP सुरू केली आणि ती ६० वर्षांपर्यंत म्हणजेच ३५ वर्षे नियमितपणे चालू ठेवली, तर चक्रवाढीचा (Compounding) चमत्कार स्पष्टपणे दिसतो.
अंदाजे वार्षिक परतावा : १५%
मासिक SIP : सुमारे १,००० रुपये
एकूण गुंतवणूक : तुलनेने कमी
अपेक्षित फंड : १ कोटी रुपयांहून अधिक
या मोठ्या निधीपैकी बहुतांश रक्कम गुंतवणूकदाराने घातलेली नसून, ती कंपाउंडिंगमधून तयार झालेली असते. वेळ जितका जास्त, तितका “रिटर्नवर रिटर्न” वाढत जातो.
३० व्या वर्षी सुरुवात केल्यास गुंतवणूक वाढते
जर गुंतवणुकीला ५ वर्षे उशीर झाला आणि सुरुवात ३० व्या वर्षी केली, तर उपलब्ध कालावधी ३० वर्षांवर येतो.
मासिक SIP : सुमारे २,००० रुपये
लक्ष्य : ६० व्या वर्षी १ कोटी रुपये
या उदाहरणातून स्पष्ट होते की, थोडासा उशीर झाला तरी मासिक गुंतवणूक दुप्पट करावी लागते. त्यामुळे ‘आज नाही तर कधीच नाही’ हा नियम SIP बाबतीत अगदी लागू होतो.
४० व्या वर्षी सुरुवात केल्यास आव्हान अधिक
जर एखाद्याने ४० व्या वर्षी SIP सुरू केली, तर हातात फक्त २० वर्षे उरतात.
मासिक SIP : सुमारे ७,५००० रुपये
अपेक्षित परतावा : १५%
लक्ष्य : १ कोटी रुपये
येथे दिसून येते की, वेळ कमी झाल्याने गुंतवणुकीची रक्कम अनेकपटींनी वाढते. परताव्याचा अंदाज समान असला तरी कमी कालावधीमुळे लक्ष्य गाठणे कठीण होते.
उशिरा सुरुवात केली? ‘स्टेप-अप SIP’ ठरू शकते उपाय
प्रत्येकालाच करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करता येतेच असे नाही. कमी पगार, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक जण उशिरा सुरुवात करतात. अशांसाठी स्टेप-अप SIP हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.
उदाहरणार्थ -
वय : ४५ वर्षे
सुरुवातीची SIP : १०,००० रुपये प्रतिमाह
दरवर्षी वाढ : १०%
कालावधी : १५ वर्षे
अपेक्षित फंड : सुमारे १ कोटी रुपये (१५% परतावा गृहित धरून)
स्टेप-अप SIP मध्ये उत्पन्न वाढेल तशी गुंतवणूकही वाढवली जाते, त्यामुळे कमी वेळेत मोठे उद्दिष्ट गाठता येते.
SIP का मानली जाते गुंतवणुकीचा सोपा मार्ग?
शिस्त : दरमहा ठरलेल्या दिवशी आपोआप गुंतवणूक
रुपया कॉस्ट अॅव्हरेजिंग : बाजार घसरला की जास्त युनिट्स, वाढला की कमी
कंपाउंडिंगची ताकद : दीर्घकाळात छोटा पैसा मोठ्या फंडात बदलतो
यामुळे बाजारातील चढ-उतारांची भीती कमी होते.
परताव्याची वस्तुस्थिती लक्षात ठेवा
तज्ज्ञांचा इशारा असा की १५% परतावा ही हमी नाही. शेअर बाजारात चढ-उतार असतात. कधी परतावा जास्त, कधी कमीही असू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतःची जोखीम क्षमता ओळखा, गरज असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि रिटायरमेंट जवळ आल्यावर काही निधी सुरक्षित पर्यायांमध्ये हलवणे शहाणपणाचे ठरते.
(विशेष सुचना- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : Early SIP investments yield larger retirement funds due to compounding. Starting at 25 requires less monthly investment than starting later. Step-up SIPs help those starting late.
Web Summary : जल्दी एसआईपी निवेश चक्रवृद्धि के कारण बड़े सेवानिवृत्ति कोष उत्पन्न करते हैं। 25 साल की उम्र में शुरू करने पर बाद में शुरू करने की तुलना में कम मासिक निवेश की आवश्यकता होती है। स्टेप-अप एसआईपी देर से शुरू करने वालों की मदद करता है।