Join us

४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:24 IST

Investment Tips: तुम्हीही ४० वर्षांचे आहात का? तुम्हालाही निवृत्तीनंतर कोट्यधीश व्हायचं आहे का? तर अजून उशीर झालेला नाही, तुम्ही तुमचं निवृत्तीचं आर्थिक ध्येय साध्य करू शकता.

Investment Tips: तुम्हीही ४० वर्षांचे आहात का? तुम्हालाही निवृत्तीनंतर कोट्यधीश व्हायचं आहे का? तर अजून उशीर झालेला नाही, तुम्ही तुमचं निवृत्तीचं आर्थिक ध्येय साध्य करू शकता. यासाठी तुम्हाला आजपासूनच SIP सुरू करावी लागेल. आजपासून दरमहा SIP मध्ये किती पैसे गुंतवावे लागतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ६० वर्षांच्या वयात तुमच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असेल.

२० वर्षांत कोट्यधीश होऊ शकता

जर तुम्ही दीर्घकाळासाठी SIP मध्ये गुंतवणूक केली तर कंपाउंडिंगच्या क्षमतेमुळे तुम्हाला अनेक पटीनं जास्त परतावा मिळू शकतो. समजा तुम्ही ४० वर्षांचे आहात आणि तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना आखत आहात. तर अशा परिस्थितीत, कंपाउंडिंगच्या फायद्यांमुळे तुम्ही फक्त २० वर्षांत कोट्यधीश होऊ शकता. दरम्यान, यासाठी नियमित गुंतवणूक आवश्यक आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'

१५×२०×१२ चा नियम

या सूत्रानुसार, जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी दरमहा किमान १५००० रुपयांचा एसआयपी केली आणि तो २० वर्षे चालू ठेवली असं समजू. जर तुम्हाला एसआयपीवर सरासरी १२% परतावा मिळाला, तर निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षी, तुमच्याकडे सुमारे १,३७,९७,८६० रुपयांचा निधी असेल. ज्यामध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची रक्कम ३६,००,००० रुपये असेल. जर तुम्हाला १२% पेक्षा जास्त व्याज मिळालं, तर रक्कम यापेक्षाही जास्त असू शकते.

२०×२०×१२ चा नियम

या गुंतवणूक सूत्रानुसार, तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दरमहा २०००० रुपये गुंतवता. जर तुमची गुंतवणूक २० वर्षे चालू राहिली आणि तुम्हाला त्यावर सरासरी १२% व्याज मिळत असेल, तर २० वर्षांनंतर म्हणजे ६० वर्षांच्या वयात, तुमच्याकडे सुमारे १,८३,९७,१४७ रुपये निधी जमेल. ज्यामध्ये गुंतवणूक रक्कम ४८,००,००० रुपये असेल.

२५×२०×१२ चा नियम

जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी एसआयपीमध्ये दरमहा ₹२५००० गुंतवले आणि तुम्ही ही गुंतवणूक २० वर्षे चालू ठेवली असं समजू. त्यावर तुम्हाला सरासरी १२% परतावा मिळाला तर, वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही २,२९,९६,४३४ रुपये जमा केले असतील. जर तुम्हालाही मोठा फंड तयार करायचा असेल, तर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी चांगली.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा