SIP Calculation: प्रत्येक व्यक्तीसाठी पैशांची बचत करणं आणि ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल गुंतवणुकीचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याची गरज नसते. तुम्ही दरमहा थोड्या थोड्या बचतीसह नियमित गुंतवणूक करून एक मोठा निधी तयार करू शकता. या पर्यायांपैकी एक लोकप्रिय पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडएसआयपी (SIP). म्युच्युअल फंडएसआयपीमध्ये कोणतीही व्यक्ती दरमहा ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण करू शकते.
म्युच्युअल फंड SIP मधील गुंतवणूक आणि परतावा
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये जर तुम्ही दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक केली, तर तुम्ही कोटी रुपयांपर्यंतचा निधी देखील बनवू शकता. मात्र, यासाठी शिस्त आणि संयम असणं गरजेचं आहे. एसआयपीमधील परतावा बाजारपेठेतील हालचालींवर अवलंबून असतो, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीत सहसा नफाच होतो. दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के दरानं परतावा मिळू शकतो. हा परतावा बाजाराच्या स्थितीनुसार कमी किंवा जास्तही असू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना फंडाची निवड विचारपूर्वक किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच करणं हिताचं ठरतं.
१००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा १००० रुपये नियमित गुंतवले आणि ही गुंतवणूक २० वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर १२ टक्के दरानं तुम्हाला एकूण ९.१९ लाख रुपयांचा निधी मिळेल. यामध्ये तुमचा एकूण नफा ६.७९ लाख रुपये असेल, तर २० वर्षांतील तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक २.४० लाख रुपये इतकी असेल.
२००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
जर तुम्ही दरमहा २००० रुपये म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमित गुंतवले आणि २० वर्षांसाठी ही गुंतवणूक कायम ठेवली, तर १२ टक्के दराने तुम्हाला एकूण १८.३९ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. या गुंतवणुकीत तुम्हाला एकूण १३.५९ लाख रुपयांचा नफा मिळेल. २० वर्षांच्या या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ४.८० लाख रुपये इतकी झालेली असेल.
३००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
जर तुम्ही दरमहा ३००० रुपये म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमित गुंतवले आणि २० वर्षांपर्यंत ही गुंतवणूक चालू ठेवली, तर १२ टक्के परताव्याच्या दरानं तुम्हाला एकूण २७.५९ लाख रुपयांचा निधी मिळेल. यामध्ये तुमचा एकूण नफा २०.३९ लाख रुपये असेल, तर २० वर्षांतील तुमची एकूण गुंतवणूक ७.२० लाख रुपये इतकी असेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Monthly SIP investments of ₹1000, ₹2000, and ₹3000 over 20 years can potentially yield ₹9.19 lakh, ₹18.39 lakh, and ₹27.59 lakh respectively, assuming 12% annual returns. Long-term disciplined investment is key, but consult experts before investing.
Web Summary : 1000, 2000 और 3000 रुपये की मासिक एसआईपी निवेश से 20 वर्षों में 9.19 लाख, 18.39 लाख और 27.59 लाख रुपये तक मिल सकते हैं, यदि वार्षिक रिटर्न 12% हो। दीर्घकालिक निवेश महत्वपूर्ण है, लेकिन निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।