Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदीचा दर वधारला! १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी 'हे' आहेत ३ जबरदस्त प्लॅन, कुठे सर्वाधिक फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:55 IST

Silver Buying Best Tips : चांदीची किंमत सध्या त्याच्या उच्चांकापेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ती खरेदी करायची असेल, तर तुम्ही काही खास टिप्सद्वारे १ किलो चांदी खरेदी करू शकता, ज्यामुळे त्याच्या किमतीत चढ-उतार असूनही तुम्हाला तोटा होण्याऐवजी नफा मिळेल.

Silver Buying Best Tips : गेल्या काही दिवसांपासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या चांदीने बुधवारी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या वायदा भावात एकाच दिवसात तब्बल ११,००० रुपयांहून अधिक वाढ झाली. चांदीचा भाव सध्या लाइफ टाइम हायपेक्षा कमी असला, तरी ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्हाला १ किलो चांदी खरेदी करायची असेल, तर घाई करण्याऐवजी योग्य नियोजनाने खरेदी केल्यास तुम्ही मोठ्या नफ्यात राहू शकता.

१. 'सिल्व्हर मायक्रो' (MCX) : कमी पैशात १ किलो चांदीचे मालक व्हाMCX वर तुम्हाला प्रत्यक्ष चांदी हातात मिळत नाही, पण तुम्ही 'फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट'द्वारे चांदी खरेदी करू शकता. १ किलो चांदीसाठी 'सिल्व्हर मायक्रो' हा उत्तम पर्याय आहे.फायदा : तुम्हाला चांदीची संपूर्ण किंमत एकाच वेळी भरावी लागत नाही. एकूण किमतीच्या केवळ १० ते २० टक्के 'मार्जिन मनी' भरून तुम्ही व्यवहार करू शकता.उदाहरण : जर ५ मार्चच्या एक्सपायरी असलेल्या १ किलो चांदीचा भाव २.६४ लाख रुपये असेल, तर तुम्हाला फक्त २६,४०० ते ५२,८०० रुपये मार्जिन म्हणून द्यावे लागतील. यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

२. सिल्वहर ईटीएफ : ७-१४-२१-२८ चा 'गोल्डन' फॉर्म्युलाप्रत्यक्ष चांदी सांभाळण्याची भीती वाटत असेल, तर सिल्व्हर ईटीएफ हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. येथे गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांनी '७, १४, २१, २८' हा नियम सुचवला आहे:नियम काय आहे? : दर महिन्याच्या ७, १४, २१ आणि २८ तारखेला प्रत्येकी ५,००० रुपयांचे सिल्व्हर ईटीएफ युनिट्स खरेदी करा.परिणाम : अशा प्रकारे वर्षभरात तुमची सुमारे २.४० लाखांची गुंतवणूक होईल, जी १ किलो चांदीच्या बरोबरीची असेल. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही आणि तुम्हाला सरासरी चांगला परतावा मिळेल.

३. फिजिकल सिल्व्हर (प्रत्यक्ष चांदी) : दागिन्यांऐवजी 'बिस्किटे' किंवा 'बार'ला पसंती द्याजर तुम्हाला चांदी घरात ठेवायची असेल, तर ज्वेलरी खरेदी करणे टाळा, कारण त्यात मेकिंग चार्जेसमुळे तुमचे नुकसान होते.स्मार्ट खरेदी : एकाच वेळी १ किलो चांदी खरेदी करण्याऐवजी दर महिन्याला १०० ग्रॅम चांदीचे बार किंवा नाणी खरेदी करा.जोखीम व्यवस्थापन : सध्या भाव अडीच लाखांवर आहे, पण काही तज्ज्ञ तो २ लाखांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवत आहेत. अशा वेळी टप्प्याटप्प्याने खरेदी केल्यास भावातील घसरणीचा तुम्हाला फायदाच होईल.

वाचा - सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी; Silver ₹६५०० नं वाढली, पाहा आजचे लेटेस्ट दर

चांदीच्या गुंतवणुकीचे विविध प्रकार

प्रकारप्रमाणगुंतवणुकीचे स्वरूप
सिल्व्हर  मेन३० किलोकमोडिटी ट्रेडिंग (MCX)
सिल्व्हर मिनी५ किलोकमोडिटी ट्रेडिंग (MCX)
सिल्व्हर मायक्रो१ किलोकमोडिटी ट्रेडिंग (MCX)
सिल्व्हर ईटीएफ१ ग्रॅमपासूनडिजिटल / पेपर फॉर्म
सिल्व्हर बार१०० ग्रॅम / १ किलोफिजिकल (प्रत्यक्ष)

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :चांदीस्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूक