Gold Silver Price 12 June: पुन्हा एकदा, सराफा बाजारात सोन्याचांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव ९२९ रुपयांनी वाढून ९७१६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीचा दर ४५४ रुपयांनी वाढलाय. या वाढीनंतर चांदीचा दर १०५९४८ रुपयांवर पोहोचलाय. जीएसटीसह त्याची किंमत १०९१२६ रुपयांवर पोहोचत आहे. तर, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत १०००७८ रुपये प्रति १० ग्रॅम झालीये.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्या चांदीचे स्पॉट रेट जाहीर केलेत. यावर जीएसटी लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
काय आहेत नवे दर?
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोन्याचे दर ९२५ रुपयांनी वाढले आणि ते ९६७७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. त्याच वेळी, दुपारीच्या सुमारास २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ८५१ रुपयांनी वाढून ८९००२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमतही ६९७ रुपयांनी वाढली आणि ती ७२८७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ५४४ रुपयांनी वाढून ५६८४१ रुपयांवर पोहोचली.